नुकताच होळीचा सण पार पडला. वेगवेगळे रंग आणि मिठाईमुळे या सणाची रंगत अजूनच वाढते. मिठाईचा गोडवा होळीचा सण अधिक खास बनवतो. परंतु काही लोक इतके गोड खातात की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना इतर आजारही घेऊ शकतात.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना काहीही खाण्या आधी खूप विचार करावा लागतो. अनेक पथ्य पाळावे लागतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने ते एखाद्या दिवशी गोड पदार्थ खाऊ शकतात. होळीच्या सणाच्या निमित्ताने सर्वांचेच गोडधोड खाणे झाले आहे. पुरणपोळ्या आणि श्रीखंडामुळे या सणाचा गोडवा आणखीनच वाढतो. परंतु यामुळे तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी वाढेल याची चिंता वाटत असेल तर तुम्ही औषधासोबतच काही घरगुती उपचारही वापरू शकता.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

Holi 2022 : होळीच्या रंगांमुळे त्वचेला होतोय त्रास? आजच वापरून पाहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

घरगुती उपचारांनी रक्तातील साखरेवर मिळावा नियंत्रण

धणे किंवा कोथिंबिरीचा रस :

धणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. त्यापासून बनवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणता येते. असे म्हटले जाते की कोथिंबीरमध्ये आढळणारे इथेनॉल रक्तातील साखर कमी करते. यासोबतच यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्सही शरीरासाठी फायदेशीर असतात.

जे लोक मधुमेहासोबत लठ्ठपणाने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कोथिंबिरीचे पाणी रोज प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. केवळ मधुमेहच नाही तर इतर आजारांचा सामना करणारे लोकही हा घरगुती उपाय करून पाहू शकतात. ज्या लोकांची पचनक्रिया चांगली नाही, ते कोथिंबिरीचे पाणी पिऊनही निरोगी राहू शकतात.

उन्हाळ्यात मसाला चहा पिणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक; ‘या’ समस्यांचा करावा लागेल सामना

कारल्याचा रस :

कारल्याची चव खूप कडू असते, त्यामुळे अनेकांना कारले खायला आवडत नाहीत. पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात चारॅटिन आणि मोमोर्डिसिन असते. ते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. मधुमेही रुग्णांनी दररोज सकाळी कारल्याचा रस पिऊ शकतात. तसेच आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांवर मात करण्यास कारल्याच्या रसाची मदत होऊ शकते.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)