पावसाळ्यात डास जरा जास्तच घरात आल्याचे पाहायला मिळतं. डास चावल्याने डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजार पसरतात. डासांचा सामना करण्यासाठी आजकाल अनेक प्रकारची औषधे आणि रसायने बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ही रसायने आणि औषधे कधीकधी डासांच्या व्यतिरिक्त घरातील सदस्यांनाही धोका देऊ शकतात. जर तुम्हालाही या ऋतूमध्ये डासांचा त्रास होत असेल तर अशी काही वनस्पती सांगणार आहोत, जी लावल्याने तुमच्या घरात डास येणार नाहीत.

१) तुळस

तुळस प्रत्येकाच्या घराबाहेर असते. तुळशीची आपण पूजा देखील करतो. तसंच आरोग्यासाठी सुध्दा तुळस भरपूर फायदेशीर आहे. डासांच्या अळ्या आणि इतर कीटकांना मारण्यासाठी तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त आहे. तुळशीला तीव्र वास असतो ज्यामुळे कीटक आणि डास दूर होतात. त्यामुळे तुळशीचे रोपटे नक्की घराबाहेर लावा.

How to use aloe vera gel for hair regrowth long hair home remedies
लांब, घनदाट केसांसाठी कोरफडबरोबर ‘या’ गोष्टी मिसळून केसांना लावा, झटपट होईल वाढ
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

२) रोजमेरी

गुलमेहंदी ज्याला आपण रोजमेरी म्हणूनही ओळखतो. अशी एक वनस्पती आहे जी डास आणि इतर प्राण्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या वनस्पतीचा वास तिखट असतो ज्याने डास , कीटक पळून जातात.

३) पुदिना

प्रत्येकाच्या घरी बनवल्या जाणार्‍या जवळपास प्रत्येक पदार्थात पुदिना वापरला जातो. पुदिनामध्ये असा वास असतो जो कीटक आणि डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. त्यासाठी तुम्ही पुदिनाचे रोपटे नक्की घराबाहेर लावा. ज्यामुळे तुमची डासांची समस्या दूर होईल.

४) झेंडूचे फुल

झेंडूचे फूल प्रत्येकाला माहिती आहे, त्याला इंग्रजी भाषेत देखील झेंडू असे म्हणतात. या वनस्पतींच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात. तुम्ही ही वनस्पती घरामध्ये किंवा बाहेर कुठेही ठेवू शकता. झेंडूचे रोपटे घराबाहेर लावल्याने डास आणि कीटक जवळ येत नाही.

५) लेमनग्रास

लेमनग्रासला उग्र वास येतो जो घरातील डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. लेमन ग्रासमध्ये सिट्रोनेला नावाचा नैसर्गिक घटक असतो ज्यामुळे डास दूर करतो आणि त्यांना मारतो. त्यामुळे घरात लेमनग्रास नक्की लावा.