नवी दिल्ली : केरळमधील कासारगोड जिल्ह्यात एका हॉटेलमधील खाद्यपदार्थात ‘शिगेला’ आणि ‘साल्मोनेला’ हे जिवाणू सापडले आहेत. या हॉटेलमधील शोरमा हा पदार्थ खाऊन ५८ जण आजारी पडले असून, एका १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ‘शिगेला’ या जिवाणूमुळे अतिसाराचा विकार होतो.

वैद्यकीय तज्ञांच्या मते, ‘शिगेला’मुळे होणाऱ्या विकारास ‘शिगेलोसिस’ म्हणतात. त्यामुळे आतडय़ात संसर्ग होऊन, पचनसंस्था बिघडते. जगभरात हा विकार आढळतो. प्रतिवर्षी जगात सुमारे १९ कोटी रुग्ण आढळतात व सुमारे दहा हजार जणांचा त्यामुळे मृत्यू होतो. 

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

या विकाराच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने प्रामुख्याने या जिवाणूचा संसर्ग होतो. हा जिवाणू जठरातून लहान आतडय़ात प्रवेशतो व तिथे मोठय़ा प्रमाणात हे जिवाणू वाढतात. त्यानंतर ते मोठय़ा आतडय़ात पसरतात. त्यामुळे पोटात कळा येतात व अतिसाराचा त्रास सुरू होतो. या जिवाणू संसर्गित वस्तूंना स्पर्श केल्याने, हे जिवाणू असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने आणि लैंगिक संबंधांमुळे त्याचा संसर्ग दुसऱ्याला होतो.

याची लक्षणे पुढीलप्रमाणे :

  • अतिसार (प्रसंगी रक्त आणि आव पडते), पोटात कळा मारतात अथवा पेटके येतात. ताप येतो. काहीच खावेसे वाटत नाही. उलटय़ा होतात.
  • या रोगाच्या प्रतिबंधासाठी साबण व पाण्याने किमान २० सेकंद हात धुवावेत. वापरलेल्या डायपरची ताबडतोब विल्हेवाट लावावी. अतिसाराचा त्रास किंवा अन्य लक्षणे असणाऱ्यांनी स्वयंपाक करू नये. झरे, तलाव व जलशुद्धीकरण न केलेल्या जलस्त्रोतांचे पाणी वापरू नये. पाणी १५ मिनिटे उकळून वापरावे.