Constipation Relief Hacks : आजकाल अनेकांना पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा पोटाच्या अनेक समस्यांनी लोक त्रस्त आहेत. जर पोटातील घाण रोज साफ झाली नाही किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटत नसेल, तर ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते. बरेच लोक दररोज सकाळी पोटस्वच्छ नसल्याच्या समस्येचा सामना करतात. जर पोट योग्यरीत्या स्वच्छ झाले नाही, तर दिवसभर आळस आणि चिडचिड होऊ शकते. पोट बिघडल्यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. त्यामुळे पोट फुगणे, जळजळ आणि इतर कामांवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, ही समस्या हळूहळू मूळव्याध, आम्लपित्त आणि त्वचेशी संबंधित समस्यादेखील निर्माण करू शकते
जर तुम्हीही पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल किंवा बद्धकोष्ठतेपासून मुक्तता कशी मिळवायची यावर औषध शोधत असाल, तर खालील एक घरगुती उपाय करून पाहा. दही आणि गुळापासून तयार केला जाणारा हा उपाय तुम्हाला पोट स्वच्छ करण्यास मदत करील.
पोट साफ करण्यासाठी प्रभावी उपाय
दही हा एक नैसर्गिक प्रो-बायोटिक पदार्थ आहे. त्यातील चांगले जीवाणू तुमचे आतडे निरोगी ठेवतात.
१) पचनसंस्था मजबूत होते.
२) बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत मिळते.
३) गॅस आणि आम्लता कमी होते.
४) शरीरात चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते.
५) जेव्हा आतड्यांमध्ये चांगले जीवाणू वाढतात तेव्हा आतड्यांची हालचाल नियमित आणि सोपी होते.
गूळ का महत्त्वाचा?
१) गुळामुळे नैसर्गिकरीत्या शरीरातील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
२) पाचक एंझाइम सक्रिय करते
३) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
४) लोहाचा चांगला स्रोत.
५) गूळ आतडे स्वच्छ करतो आणि मल मऊ करण्यास मदत करतो, ज्यामुळे सकाळी पोट साफ करणे सोपे होते.
दही आणि गुळाचा वापर कसा करावा?
१ वाटी ताजे दही
१-२ चमचे गूळ (किसलेला)
कसे सेवन करावे?
१) एक वाटी ताजे दही घ्या.
२) त्यात बारीक किसलेला गूळ चांगला मिसळा.
३) हे मिश्रण जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.
४) तयार झालेल्या या पदार्थाचे ५-७ दिवस सतत सेवन करा.
पोट स्वच्छ करण्यासाठी दही आणि गुळाचे फायदे
१) बद्धकोष्ठतेपासून आराम
हे मिश्रण मल मऊ करते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. हे आतड्यामधून कोणताही कचरा बाहेर काढण्यास मदत करू शकते.
२) पोटातील घाण काढून टाकते
दही आणि गुळाचे मिश्रण खाल्ल्याने आतड्यांमधील विषाक्त घटक आणि कचरा हळूहळू बाहेर पडण्यास मदत होते. पोट स्वच्छ करण्यासाठी हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.
३) गॅस आणि आम्लता कमी करते
दही आणि गूळ हे दोन्ही पोटासाठी चमत्कार मानले जातात. दह्याचा थंडावा आणि गुळाचा उबदारपणा यांमुळे पोटाचे संतुलन राखले जाते.
४) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
दह्यातील प्रो-बायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुमचे आतडे स्वच्छ करण्यासह तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवू शकता.
५) त्वचा उजळवणे
पोट स्वच्छ असताना चेहऱ्यावरील मुरमे आणि डाग कमी होतात. म्हणून तुम्ही हे घरगुती उपाय नक्कीच करून पाहावे.
ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन करावे. जर तुम्हाला तीव्र अतिसार होत असेल, तर दही कमी प्रमाणात खा. हिवाळ्यात रात्री खूप थंड दही खाणे टाळा.
पोट स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?
१.दररोज ८-१० ग्लास पाणी प्या.
२.फायबरयुक्त पदार्थ (सॅलड, फळे, हिरव्या भाज्या) खा.
३.सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या.
४.दररोज २०-३० मिनिटे चाला
५. ताण कमी ठेवा
