Lemon Water Benefits : आजच्या काळात लोक डिटॉक्स ड्रिंक्स आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हेल्थ हॅक्स फॉलो करताना दिसतात. यात आपण अनेकदा अशा सोप्या सवयींकडे दुर्लक्ष करतो, ज्यांमागे खरे वैज्ञानिक कारण असते. लिंबू पाणी हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर पेय मानले जाते. अनेक लोक हे फक्त ताजेतवाने वाटण्यासाठी पितात, पण याचे आरोग्याला होणारे फायदे त्याहून कितीतरी जास्त आहेत. प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे लिंबू पाणी पिण्याचे काही महत्वाचे फायदे सांगितले आहेत, तेच आपण जाणून घेऊ…
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी:
लिंबू हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. डॉ. शुभम वत्स यांच्या मते, रोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वेगाने वाढते. हे पांढऱ्या रक्तपेशींच्या (White Blood Cells) निर्मितीला चालना देते, ज्यामुळे सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन आणि ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.
पचनक्रियेसाठी उत्तम:
जर तुम्ही गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्येने त्रस्त असाल, तर सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे. लिंबाचा रस यकृतामध्ये (Liver) पित्त रस (Bile Juice) तयार करण्यास मदत करतो, जो पचनासाठी अत्यंत आवश्यक असतो. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून आतडे स्वच्छ आणि निरोगी ठेवते.
वजन कमी करण्यास उपयुक्त:
लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठीही खूप मदतीचे ठरते. लिंबामध्ये ‘पेक्टिन फायबर’ असते, जे वारंवार लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. कोमट पाण्यासह याचे सेवन केल्याने शरीराचा मेटाबॉलिझम (चयापचय दर) वाढतो, ज्यामुळे चरबी आणि कॅलरीज वेगाने बर्न होतात.
त्वचेवर नैसर्गिक चमक:
लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून उत्तम डिटॉक्स ड्रिंकसारखे काम करते. शरीर आतून स्वच्छ झाले की त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. याच्या नियमित सेवनाने पिंपल्स, सुरकुत्या आणि डाग कमी होतात. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार राहते.
किडनी स्टोनपासून बचाव:
लिंबामध्ये नायट्रिक/सायट्रिक ॲसिड मुबलक प्रमाणात असते. डॉ. शुभम वत्स यांच्या मते, हे लघवीचे प्रमाण आणि पीएच (pH) पातळी वाढवते. लिंबू पाणी प्यायल्याने मूत्रपिंडात कॅल्शियमचे खडे तयार होत नाहीत, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका बऱ्याच अंशी टळतो.
सेवन करण्याची योग्य पद्धत
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हलक्या कोमट पाण्यासह लिंबू पाणी प्यायल्यास याचा सर्वाधिक फायदा होतो, असा सल्ला डॉ. शुभम वत्स देतात.
