वजन कमी होत नाही? मग आहारात करा कोबीचा समावेश

जाणून घ्या, कोबी खाण्याचे ११ फायदे

कधी काळी नावडतीच्या भाज्यांपैकी कोबीचं नाव हमखास यायचं. मात्र, आता कोबीचा वापर चायनीज किंवा अन्य फास्टफूडमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक जण हाच कोबी आवडीने खाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे कोबी खाण्याचे शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. मात्र, ते फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळे कोबी खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

कोबी खाण्याचे फायदे

१. आतडय़ांचा व आमांशयाचा आंत्रव्रण (अल्सर) टाळण्यासाठी कोबीचा रस सेवन करावा.

२. प्रसूती झालेल्या मातेला दूध कमी येत असल्यास कोबीचा आहारात वापर करावा.

३.रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

४. वजन कमी होण्यास मदत मिळतेय

५. पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोबी किसून त्यावर थोडे मीठ, काळी मिरी व लिंबू पिळून खाल्ल्यास पचन व्यवस्थित होऊन पोट साफ होते.

६.त्वचेवर जखमा, पुरळ, इसब, अ‍ॅलर्जी झाली असेल तर कोबी बारीक वाटून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात.

७. त्वचा भाजल्यामुळए जखम झाल्यास त्यावर कोबीचं बाहेरील पान गरम पाण्याने धुवून जखमेवर मऊ कापडाने बांधावे.

८. सर्दी झाल्यास कोबीची पाने उकळत्या पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.

९.रक्त किंवा आमवाताने सांध्यांना सूज आली असेल तर त्या ठिकाणी कोबीची पाने गरम करून बांधावीत. यामुळे दुखणाऱ्या सांध्याला आराम मिळतो.

१०. कोबी खाल्ल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी दूर होतात.

११. कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी आवडत नसेल तर भोजनानंतर कोबीचा अर्धा ग्लासभर रस थोडेसे लिंबू पिळून घ्यावा. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होऊन आरोग्य सुधारते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health benefits of eating cabbage ssj

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या