scorecardresearch

हिवाळ्यात हळद खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

हळद खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या

हिवाळ्यात हळद खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
हळद खाण्याचे फायदे (Photo: Freepik)

भारतीय पद्धतीने जेवण बनवताना त्यात सर्रास हळदीचा वापरं केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद फायदेशीर मानली जाते हे आपण अनेकदा ऐकतो. पण यासह हळदी आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरते. जेवणात हळदीचा समावेश केल्याने ते कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

हळदीचे फायदे

इन्फेकशन, सर्दी, खोकला यापासून वाचण्यासाठी ठरते फायदेशीर
हळदीमध्ये विटामिन सी, के यासह पोटॅशिअम, प्रोटीन, कॉपर, झिंक, फॉस्फरस असे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मिनरल्स आढळतात. तसेच हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटिफंगल गुणधर्म आढळतात. यांमुळे सर्दी, खोकला, इन्फेकशनपासून वाचण्यासाठी हळद मदत करते.

आर्थरायटिसच्या वेदना कमी करण्यास मदत करते
हळदीमध्ये करक्युमिन आढळते, जे सुज कमी करण्यासाठी तसेच त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. सांधेदुखी, आर्थरायटिसच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी हळद मदत करू शकते. यासाठी दुधात किंवा गरम पाण्यात हळद टाकून त्याचे सेवन करू शकता.

पोटाशी निगडित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीही ठरते फायदेशीर
हळदीमध्ये आढळणाऱ्या अँटीइन्फ्लेमेटरी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे पोटाशी निगडित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण कमी पाणी पितात, त्यामुळे अनेकांना अन्नपचनाचा त्रास होतो. यासाठीही हळद कच्च्या लिंबुसह खाणे फायदेशीर ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या