scorecardresearch

रूग्णांसाठी आरोग्य सल्ला ऑनलाइन सेवा

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटशी रूग्ण बोलू शकतात.

रूग्णांसाठी आरोग्य सल्ला ऑनलाइन सेवा
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रूग्णांना मदत करणारे व्हिझिट नावाचे एक वैद्यकीय उपयोजन डिजिटल असिस्टंटच्या माध्यमात विकसित करण्यात आले असून ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. हे ऑनलाइन उपयोजन डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देणारे असून तो स्टार्टअप सेवेचा एक प्रकार आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटशी रूग्ण बोलू शकतात.

वैद्यकीय तज्ज्ञ, साधे डॉक्टर यातून तुम्ही सल्लागाराची निवड करू शकता. यातून डॉक्टरांचे ओझेही कमी होणार आहे. देशात डॉक्टरांची कमतरता असल्याने चॅटबोटची ही सुविधा महत्त्वाची आहे. अनेकदा फॅमिली डॉक्टरांकडेही रूग्णांची मोठी रांग असते त्यामुळे त्यांना भेटता येत नाही, शिवाय अनेकदा त्यांना भेटले तरी ते तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगतात. चॅटबोटशी रूग्णाने चर्चा केल्यानंतर तोच तुम्हाला साध्या डॉक्टरांचा सल्ला उपयोगी आहे  की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला लागेल हे सांगतो. त्यानुसार तुम्हाला ऑनलाइनच तज्ज्ञ किंवा साधारण डॉक्टरकडे पाठवले जाते. व्हिजिट इंटरनेटसेवा बिट्स पिलानीच्या चार विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. त्याला मॅप माय इंडियाने पैसे दिले आहेत.

दक्षिण दिल्लीतील ओखला येथून  ही सेवा चालवली जाते. शाश्वत  त्रिपाठी याने सांगितले की, यात आम्ही रात्रंदिवस अनेक प्रयोग केले, यात रोबोटला तुम्ही माहिती सांगितल्यानंतर तो त्याच्याकडे उपलब्ध लक्षणांच्या आधारे निदान करून  तुम्हाला कोणत्या डॉक्टरांची गरज आहे ते ठरवतो.

सध्या दिवसाला सातशे रूग्ण या बोटचॅटचा फायदा घेत आहेत. यात सध्या मनोविकारतज्ज्ञ, लैंगिक रोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ असे २२०० डॉक्टर्स सहभागी आहेत. साध्या एमडी डॉक्टरसाठी ४०० रूपये, तर मनोविकार तज्ज्ञ- ८०० रूपये, लैंगिकरोगतज्ज्ञ ५०० रूपये, स्त्रीरोगतज्ज्ञ-४०० रूपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2018 at 01:41 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या