Men Health Tips: वर्क फ्रॉम होममुळे घरातून काम करण्याची संस्कृती वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरून काम करत असल्याने लॅपटॉपचा वापर वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की लॅपटॉपचा अतिवापर तुमच्या रिप्रोडक्टिव हेल्थवर परिणाम करू शकतो. दिवसभर लॅपटॉप वापरल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे आपली त्वचा आणि अंतर्गत ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्याच्यासोबत बराच वेळ मांडीवर बसून काम केल्यानेही पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते. त्याच बरोबर लॅपटॉप पेक्षा जास्त नुकसान त्याच्याशी जोडलेल्या वायफाय मुळे होते. कारण रेडिएशन हे इंटरनेट कनेक्शनशी संबंधित आहे. लॅपटॉपला मांडीवर ठेवून त्याचा वापर का करू नये? यामुळे तुमच्या आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते? जाणून घ्या…

मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करण्याचे तोटे

पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका
लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकते. याचे कारण म्हणजे शरीराचा पोत. स्त्रियांमध्ये गर्भाशय शरीराच्या आत असते, तर पुरुषांमध्ये अंडकोष शरीराच्या बाहेरील स्थितीत असतो,. त्यामुळे हिट रेडिएशन पुरूषांच्या जवळून होत असतं. त्यामुळे पुरुषांनी लॅपटॉप वापरताना विशेष काळजी घ्यावी. उच्च तापमानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरत असल्याने प्रजननक्षमतेमध्ये समस्या उद्भवू शकतात.

आणखी वाचा : Men Health Tips: मनुका खाल्ल्याने पुरुषांच्या ‘या’ समस्या दूर होतात, या प्रकारे सेवन करा

वायफायद्वारे रेडिएशन पसरते
लॅपटॉपवर दीर्घकाळ काम करण्यापेक्षाही जेव्हा तुम्ही ते स्वतःवर ठेवून वापरता ते फार वाईट आहे. हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होते, तर ब्लूटूथ कनेक्शनमधून तेच रेडिएशन बाहेर येतं. रेडिएशनच्या प्रभावामुळे तुम्हाला निद्रानाश, तीव्र डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्नायू दुखी उद्भवू शकते
लॅपटॉप पायावर किंवा मांडीवर ठेवण्याऐवजी टेबलावर ठेवून त्याचा वापर करा. काही लोक लॅपटॉप वापरताना पाय चिकटवून बसतात, त्यामुळे लॅपटॉपचे रेडिएशन थेट शरीरावर पडतात. उपकरणातून निघणारी उष्णता तुम्हाला आजारी बनवू शकते. सतत लॅपटॉप वापरणे टाळा. यामुळे आपल्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.