scorecardresearch

आरोग्यवार्ता : क्रॅनबेरी फळ हृदयासाठी उपयुक्त

बेरी म्हणजे लहान आकाराची आंबट-चिंबट फळे. आपल्याकडे मिळणारी बोरं ही बेरी या प्रकारातीलच, त्याशिवाय स्ट्रॉबेरी, लिची, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी हीही बेरी या प्रकारातीलच फळे.

न्यूयॉर्क : बेरी म्हणजे लहान आकाराची आंबट-चिंबट फळे. आपल्याकडे मिळणारी बोरं ही बेरी या प्रकारातीलच, त्याशिवाय स्ट्रॉबेरी, लिची, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी हीही बेरी या प्रकारातीलच फळे. बाजारात मिळणारे लाल रंगाचे क्रॅनबेरी हे बेरी या प्रकारातील फळ आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते. नियमित क्रॅनबेरी या फळाचे सेवन केल्याने हृदयरोग टाळता येतो, असे संशोधन अमेरिकेतील संशोधकांनी केले आहे.

ताज्या क्रॅनबेरी फळात जवळपास ९० टक्के पाणी असते, मात्र मोठय़ा प्रमाणात कबरेदके आणि फायबर असते. जी शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. क्रॅनबेरीमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. बाजारात क्रॅनबेरीची पूडही मिळते. फळे न मिळाल्यास क्रॅनबेरी पूड नियमित सेवन केल्यास रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे हृदयविकार टाळता येतो, असे या संशोधकांकडून सांगण्यात आले. ‘फूड अ‍ॅण्ड फंक्शन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या संशोधकांनी ४५ निरोगी पुरुषांना क्रॅनबेरीची पूड एका महिन्यासाठी सेवन करण्यास दिली. या ४५ जणांची वैद्यकीय तपासणी दर आठवडय़ाला करण्यात आली. दररोज नऊ ग्रॅम क्रॅनबेरी पूड पाण्यासोबत घेतल्यास शरीराला ५२५ ग्रॅम पॉलिफेनॉल मिळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते, असे या संशोधकांनी सांगितले.

या ४५ जणांचे हृदयाचे ठोके, रक्तदाब, रक्तातील चरबी आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजण्यात आले. या प्रमाणात सुधारणा झाली होती. या व्यक्तींचा रक्तप्रवाह सुधारला होता, असे या संशोधकांच्या लक्षात आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health cranberry fruit good heart fruits market cranberry health ysh

ताज्या बातम्या