scorecardresearch

Alzheimer’s Disease : ‘या’ सवयींमुळे कमी वयातच वाढतोय अल्झायमरचा धोका

World Alzheimer’s Day 2022 : अल्झायमर हा आजार स्मरणशक्ती संबंधित आहे. यामुळे संबंधीत व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Alzheimer’s Disease : ‘या’ सवयींमुळे कमी वयातच वाढतोय अल्झायमरचा धोका
या आजाराचे वेळीच निदान होणे अतिशय आवश्यक आहे. (Photo : Freepik)

अल्झायमर हा आजार स्मरणशक्तीशी संबंधित आहे. यामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती कमी झाल्याने त्याच्या दिनचर्येत व्यत्यय येऊ शकतो. इतकेच नाही तर संबंधीत व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या आजाराचे वेळीच निदान होणे अतिशय आवश्यक आहे.

जगभरात असे लाखो रुग्ण आहेत जे अल्झायमरसारख्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. शिवाय, येत्या काही वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अल्झायमर हा आजार व्यक्तीची स्मरणशक्ती, वैचारीक पातळी आणि वर्तनावर परिणाम करतो. यामुळे एखादी व्यक्ती आपली दैनंदिन कामे सहजतेने करू शकत नाही. हा आजार सामान्यतः वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येते. मात्र, या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्‍यास कमी वयातही त्याचा धोका उद्भवू शकतो.

अल्झायमरवर अद्याप कोणताही इलाज नाही, परंतु उपचारांमुळे रोगाचा धोका कमी करता येऊ शकतो आणि म्हणूनच योग्य उपचारांसाठी वेळीच या आजाराचे निदान होणे आवश्यक आहे, असे अपोलो स्पेक्ट्रा मुंबई येथील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, डॉ अमित शोबावत यांनी सांगितले.

Photos : भाजलेला कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील; अनेक अवयवांसाठी आहे गुणकारी

डोंबिवली येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट कविता बर्‍हाटे म्हणतात, काही गोष्टींचा विसर पडणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ज्यांना अल्झायमरचा आजार आहे ते रोजच्या दिनचर्येतील महत्त्वाच्या गोष्टीही विसरत असल्याचे दिसून येते. ज्यांना अल्झायमर आहे त्यांना स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात किंवा लिहिण्यात अडचणी येणे, वेळ किंवा ठिकाण न समजणे, मित्र आणि कुटुंबापासून दूर जाणे, गोंधळ उडणे, चिडचिड होणे आणि नैराश्य येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

कौटुंबिक इतिहास, वय, अनुवांशिकता, धूम्रपान आणि नैराश्य ही अल्झायमर वाढण्याची मूलभूत कारणे असू शकतात. अल्झायमरवर वेळीच योग्य उपचार न केल्यास भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या आजाराचा वेळीच शोध घेणे आणि त्यानुसार वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news alzheimer is common among young people these habits increase the risk of dementia at an early age pvp