scorecardresearch

आरोग्य वार्ता : करोना अद्यापही धोकादायक

करोना साथीची अतिशय बिकट परिस्थिती अनुभवलेल्या जगाची चिंता अद्यापही कमी होण्याची लक्षणे नाहीत.

corona
मुंबईतील चार प्रभाग ‘एच३ एन२’च्या विळख्यात  (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

वॉशिग्टन : करोना साथीची अतिशय बिकट परिस्थिती अनुभवलेल्या जगाची चिंता अद्यापही कमी होण्याची लक्षणे नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) हे संकट कायम असल्याचे नमूद केले आहे.

करोनाची साथ वेगाने पसरू लागल्यानंतरच्या तीन वर्षांच्या कालखंडानंतर सोमवारी ‘डब्ल्यूएचओ’कडून सर्वात गंभीर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ही साथ अद्यापही चिंतेचा विषय असून सार्वजनिक आरोग्य सेवेची आणीबाणी कायम आहे, असेही ‘डब्ल्यूएचओ’ स्पष्ट केले आहे.

करोना हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला असून विषाणू कदाचित संक्रमण बिंदूवर आहे. त्यामुळे सतर्कता आवश्यकता आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले. जागतिक साथीबाबत आंतरराष्ट्रीय आरोग्य नियामक आपत्कालीन समितीची २७ जानेवारी रोजी बैठक झाल्यानंतर ‘डब्ल्यूएचओ’ने प्रतिक्रिया दिली आहे. समितीने दिलेल्या सल्ल्याबाबत सहमती दर्शविताना करोना हा जागतिक चिंतेचा विषय असल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले. करोना मानवी आरोग्य आणि आरोग्य यंत्रणेचे मोठे नुकसान करण्याबरोबर एका धोकादायक संसर्गजन्य आजार झाला आहे, याबाबतही संघटनेने प्रतिक्रिया दिली आहे. समितीने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी हटविल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबतही चर्चा केली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 03:30 IST