नवी दिल्ली : कितीही बिकट परिस्थिती असली तरी आनंदी राहणारी व्यक्ती कोणत्याही संकटावर सहज मात करू शकते, असे म्हणतात; पण आता हे संशोधनामुळेही सिद्ध झाले आहे.
आनंदी राहिल्याने जीवनशैली सुधारण्यास मदत होते. ‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार आनंदी व्यक्ती फळे आणि भाज्यांचा आहारात अधिक प्रमाणात समावेश करतात. त्याचबरोबर ते शारीरिकदृष्टय़ा सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आनंदी लोक दीर्घायुषी ठरतात. त्यांचे हृदयाचे आरोग्यही उत्तम असते.
रोगप्रतिकारशक्ती उत्तम : चांगल्या आरोग्यासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. संशोधनानुसार आनंदी व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते. एवढेच नव्हे तर सर्दी होण्याचे प्रमाण अशा व्यक्तीमध्ये कमी असते. तसेच त्यांना फुप्फुसाचा संसर्गही होण्याची शक्यता कमी असते, असे संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
आनंदी राहण्याचे फायदे :
* जीवनशैली सुधारते
* हृदयरोगापासून दूर राहणे शक्य
* तणाव कमी करण्यास मदत
* मेंदुघाताचा धोका कमी
* आयुर्मान वाढण्याची शक्यता वाढते.