कॉर्न खाणे प्रत्येकाला आवडतं. त्यात जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर रस्त्याच्या कडेला, तापलेल्या निखाऱ्यांवर भाजलेल्या कणसाचा वास लोकांना त्याकडे आकर्षित करतो. कॉर्न फक्त केवळ चवीच्या दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. १०० ग्रॅम उकडलेल्या कॉर्नमध्ये ९६ कॅलरीज, ७३% पाणी, ३.४ प्रथिने, २१ ग्रॅम कार्ब, ४.५ ग्रॅम साखर, २.४ फायबर आणि १.६ फॅट असते. त्यात खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील आहे. ११२ ग्रॅम पॉपकॉर्नमध्ये १६ ग्रॅम फायबर असते.याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात आढळते. त्यात कोलेस्टेरॉलची पातळी खूप कमी असते.आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही तुम्हाला माहीत आहे का की रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहेत. कसे ते जाणून घेऊया.

रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न खाण्याचे नुकसान

माश्या आरोग्य बिघडवू शकतात

रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या कॉर्नवर माश्या दिवसभर बसतात. या माश्या कॉर्नमध्ये बसण्यासोबतच त्यात अनेक जीवाणू आणि जंतू सोडतात. अशा कॉर्नचे सेवन केल्याने तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता. उघड्यावर ठेवलेला असा कॉर्न न खाण्याचा प्रयत्न करा.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

( हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरामध्ये होणाऱ्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये)

वायू प्रदूषकांच्या संपर्कात येतात

रस्त्याच्या कडेला आढळणारे कॉर्न दिवसभर मोकळ्या हवेत ठेवतात आणि सर्व प्रकारच्या वायु प्रदूषकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे हवेसोबत येणारे कण मक्यासोबत तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला आजारी बनवू शकतात.त्यामुळे रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवलेले कणीस खाणे टाळावे.

लिंबाचा रस आणि मसाला देखील तुम्हाला आजारी बनवू शकतात

कॉर्नवर लावलेले मीठ आणि लिंबू बर्‍याच कधीचे असतात हे समजत नाही. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची भीती असते.कॉर्नमध्ये पिळून काढलेला लिंबाचा रस आणि मसाले रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉर्नची चव वाढवतात. पण रस्त्याच्या कडेला कॉर्न विक्रेते एकच लिंबू अनेक वेळा वापरतात. इतकेच नाही तर अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी बहुतेक लोक खराब झालेले किंवा टाकून दिलेले लिंबू वापरायला सुरुवात करतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न खाणे सहसा टाळाच.