scorecardresearch

आरोग्य वार्ता : वामकुक्षीमुळे अंधत्वाचा धोका

‘ब्लुबर्ग’च्या अहवालानुसार रात्रीऐवजी दिवसा झोपण्याची समस्या दीर्घ काळ राहिली तर ‘ग्लुकोमा’चा धोका वाढतो.

आरोग्य वार्ता : वामकुक्षीमुळे अंधत्वाचा धोका
झोपण्याची समस्या ( Photos : Freepik) (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : डॉक्टर सहा ते आठ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. कारण चांगल्या झोपेमुळे संपूर्ण दिवस चांगला जातो आणि आरोग्यही चांगले राहते. मात्र रात्री चांगली झोप झाली नाही तर अशी व्यक्ती वामकुक्षी घेते. नव्या संशोधनानुसार याचा डोळय़ांवर दुष्परिणाम होतो. कधी कधी ही परिस्थिती हाताबाहेर जाते आणि अंधत्वही येऊ शकते.

‘ब्लुबर्ग’च्या अहवालानुसार रात्रीऐवजी दिवसा झोपण्याची समस्या दीर्घ काळ राहिली तर ‘ग्लुकोमा’चा धोका वाढतो. विशेष म्हणजे वेळेवर उपचार केले नाहीत तर अंधत्व येऊ शकते.

‘बीएमजे ओपन जर्नल’मध्ये प्रकाशित संशोधानानुसार ग्लुकोमामुळे कायमचे अंधत्व येते. त्यावर उपचार जवळपास अशक्य होतात. तसेच रात्री पुरेशी झोप न घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ‘ग्लुकोमा’चा त्रास होतो. ज्येष्ठ नागरिक आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीलाही व्याधीने ग्रासणे ही तर सर्वसामान्य बाब आहे. ब्रिटनमधील ‘बायोबँक’ने केलेल्या संशोधनानुसार ४० ते ६९ या वयोगटातील चार लाखपेक्षा अधिक व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण करण्यात आले असून त्यांना झोपेच्या सवयीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. २०१० ते २०२१ दरम्यान झालेल्या या अभ्यासादरम्यान ८ हजार ६९० जणांना ‘ग्लुकोमा’चा त्रास आढळला होता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 04:46 IST

संबंधित बातम्या