अनेकदा आपण जर खूपवेळा एकाच जागेवर बसून राहिलो, तर आपल्या हातापायांना मुंग्या येतात. पण हातपाय मोकळे सोडले की काहीवेळाने ते पूर्ववत होतं. हातापायाला मुंग्या येणे ही अत्यंत सामान्य बाब असली, तरीही काहीजणांना याचा खूप त्रास होतो. मुख्यतः हिवाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो. बऱ्याचदा ही समस्या सतत जाणव असली तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र शरीरात मुंग्या येणे हे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. आज आपण शरीरात मुंग्या येण्याची कोणकोणती कारणे असू शकतात, याबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • मधुमेह

जेव्हा रक्तामधील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा शरीरात मुंग्या येण्याची समस्या सुरु होते. रक्तातील साखर वाढल्याने नसांना नुकसान पोहोचते, यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते.

Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

  • मणक्यावर दबाव पडणे

पाठीच्या मणक्यावर दबाव पडल्यास शरीरात मुंग्या येऊ शकतात. जेव्हा तुम्ही खूप वजन उचलता किंवा बराच वेळ एकाच स्थितीत राहता तेव्हा मणक्यावर दाब पडू लागतो, यामुळे मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते.

  • विशेष थेरपी

जर तुम्हाला एखादा मोठा आजार असेल आणि यासाठी तुम्ही केमोथेरपी, रेडिएशन थेरपी घेत असाल तर तुम्हाला शरीरात मुंग्या येण्याची समस्या जाणवू शकते.

  • ऑटोइम्यून आजार

ल्युपस आणि संधिवात यांसारख्या ऑटोइम्यून आजारांमुळे, आपली प्रतिकारशक्ती शरीराच्या काही भागांवरच आक्रमण करू लागते. यामुळे हातापायांना मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते.

Post-abortion care: गर्भपातानंतर ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या; जाणून घ्या कसा असावा तुमचा आहार

  • शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता

आपल्या शरीराला कॅल्शिअम, पोटॅशिअम, सोडिअम, व्हिटॅमिन बी अशा पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. शरीरात या तत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास हातापायांना मुंग्या येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news these five reasons can cause tingling in hands and feet may be a sign of serious illness pvp
First published on: 06-10-2022 at 09:52 IST