Weight loss: निरोगी राहण्यासाठी, तुम्हाला हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का पाणी तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या पद्धतीने मदत करू शकते? खरं तर, अगदी वजन कमी करण्यात पाणी महत्त्वाची भूमिका पार पडू शकते पण नेमकं किती पाणी प्यावे हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. फलक हनीफ, कार्यकारी पोषणतज्ञ, क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, बंगळुरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीराचा ६० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. शरीर या पाण्याचा वापर चयापचय, शरीराचे तापमान नियंत्रित करणे आणि पोषक तत्व शरीरात वाहून नेण्यासाठी करते.

वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यावे? (How Much Water Important For Weight Loss)

हनिफ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी दररोज किमान १.५ ते २ लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. पण तुम्हाला भूक कधी लागली आहे व शरीर कधी डिहायड्रेटेड झाले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तणावपूर्ण शारीरिक हालचालींनंतर, आपल्याला भूक लागली आहे असे गृहीत धरून आपण गोड पेय पितो. परंतु प्रत्यक्षात, एक किंवा दोन ग्लास पाणी आवश्यक असते. अशावेळी आणि आपण अनावश्यक कॅलरींचे सेवन टाळू शकता.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
How many times we should boil milk know Correct Way To Boil Milk
Milk Boiling Tips: दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती? किती वेळा उकळावे, जाणून घ्या
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Tea and Weight Gain
रोज १ कप चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? पोषणतज्ज्ञांनी सोडवला वाद

वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे चांगले असले तरी ते कधी प्यावे हे देखील जाणून घेतले पाहिजे.

• तुम्ही तुमचे अन्न खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते.

• कॅलरीचे सेवन कमी करून दिवसाला १.५ ते २ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

• तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ५०० मिली पाणी पिऊन करू शकता यामुळे दिवसभर तुमची चयापचय क्रिया ऍक्टिव्ह राहण्यास मदत होते.

• जेवणासह कार्बोनेटेड पेयांपेक्षा पाणी निवडा. त्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात.

• व्यायाम करण्यापूर्वी नेहमी पाणी निवडा, कारण ते तुम्हाला संपूर्ण रुटीनमध्ये हायड्रेट ठेवू शकते

• थकवणाऱ्या कामानंतर मिल्कशेक किंवा थंड ज्यूसऐवजी पाणी प्या. अशा वेळी आपण अनेकदा अतिरिक्त कॅलरी वापरतो आणि आपल्या शरीराला अतिरिक्त साखर देतो.

तसेच जेवणानंतर पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते. तसेच, रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे टाळा. हे तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते.

तज्ज्ञ म्हणतात की पाण्याचे सेवन वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग वाढून कॅलरीज कमी होऊ शकतात. एकदा असे झाले की तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते पण त्यासाठी केवळ पाण्यावर अवलंबून राहणे चुकीचे ठरेल. आपण योग्य आहार व व्यायाम सुद्धा करायला हवा.