नवी दिल्ली : अ‍ॅलर्जीतून होणाऱ्या सर्दीमुळे नाक सतत वाहणे, नाक चोंदण्याचा त्रास काही जणांना सतत होतो. हवेतील सूक्ष्म कण, परागकण, धूलिकणांमुळे काहींना हा त्रास होतो. नाक किंवा तोंडावाटे हे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे नाक सतत वाहते. शिंका येत राहतात. कान बधीर होतात. नाक चोंदल्याने नाकावाटे श्वास घेणे कठीण होते.  पाणी येत राहते. घसा खवखवतो. कुठल्याही वयोगटात हा त्रास उद्भवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक ऋतुबदलात हा त्रास होतो. या विकाराच्या रुग्णाच्या कुटुंबात अशी अ‍ॅलर्जी असणारे आप्त असतात. वंशपरंपरेने हा त्रास होऊ शकतो. धूलिकण, वनस्पती, बुरशीच्या संपर्कात आल्यावर हा विकार होतो. कबुतराच्या विष्ठेमुळे व पिसांमुळेही हा त्रास होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांतही हा विकार पहावयास मिळतो. रुग्णाची सर्वागीण तपासणी करून त्याच्या कुटुंबाचा इतिहास तपासून तसेच रुग्णाच्या लक्षणांचे सातत्याने निरीक्षण करून त्यास अ‍ॅलर्जी आहे का, याचे नेमके निदान करता येते. काही त्वचा चाचण्या, रक्त तपासणीद्वारेही निदान पक्के करता येते. त्यानंतर त्याच्या प्रतिबंधासाठी उपाय करता येतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health prevent allergies with simple measures allergies cold nose trouble ysh
First published on: 08-05-2022 at 00:02 IST