scorecardresearch

आरोग्यवार्ता : अतिलठ्ठ पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका

अतिलठ्ठ पुरुषाला प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असतो, असे संशोधन फ्रान्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

पॅरिस : अतिलठ्ठ पुरुषाला प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असतो, असे संशोधन फ्रान्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. प्रोस्टेट कर्करोगामुळे अतिलठ्ठ व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो, असे या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग असून जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले. प्रोस्टेट ग्रंथी अक्रोडाच्या आकाराच्या असतात. पुरुषांच्या मूत्रपिंडाच्या खाली या ग्रंथी असतात आणि त्या शुक्राणूंचे वहन करण्यास मदत करतात. या ग्रंथींमधील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे प्रोस्टेट कर्करोगाची सुरुवात होते.

अतिलठ्ठ पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये पेशींची अनियंत्रित वाढ मोठय़ा प्रमाणात होते, त्यामुळे त्यांना कर्करोगाचा धोका अधिक असतो, असे या संशोधकांनी सांगितले. त्यासाठी या संशोधकांनी या विषयावर प्रकाशित झालेल्या सर्व अभ्यासांचे परीक्षण केले. प्रोस्टेट कर्करोग झालेल्या २५ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासले, त्यानंतर हा निष्कर्ष काढला.

बॉडी मास इंडेक्समध्ये पाच पॉइंटने जरी वाढ झाली तरी प्रोस्टेट कर्करोग झालेल्यांमध्ये मृत्यूचा धोका १० टक्क्यांनी वाढतो, असे ऑरोरा पेरेझ-कॉर्नागो यांनी सांगितले. ‘बायोमेड सेंट्रल मेडिसिन’ या नियतकालिकेमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health risk prostate cancer obese men obese individuals death global health organization ysh

ताज्या बातम्या