Kids Screen Time And Eating Habits : आजकाल मुलांना जेवण भरवताना आधी हातात मोबाइल द्यावा लागतो, हे आता प्रत्येक घरात पाहायला मिळतं. पालकांना वाटतं की, मोबाईलमुळे का होईना मुलं भरभर खातं, त्यांच पोट भरत. अशाप्रकारे पालक आपलं काम हलक करतात. पण हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे याचा कधी विचार केला का? नसेल तर करा, कारण हे मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही.याच मुलांच्या पोषणावर होतोय. याचविषयी एमबीबीएस डॉक्टर, हेल्थ अँड वेलनेस एक्सपोर्ट डॉ. सोनू खोखर यांनी सविस्तर सांगितले आहे.

मुलांना जेवण भरताना मोबाइल देत असाल तर ‘या’ गोष्टी घ्या जाणून

१) तज्ज्ञांच्या मते, मुलांना जेवण भरवताना मोबाइल दिल्यास त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. यामुळे ते अधिक वेगाने खातात, पण असे करणे योग्य नाही.

२) ५ वर्षांखालील मुलांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो, या वयात भूक आणि तृप्तीची केंद्रे देखील योग्यरित्या विकसित झालेली नसतात, यामुळे त्यांना खाण्याची व पोट भरल्याची भावना समजत नाही.अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्याला मोबाइल देता, तेव्हा त्याला अन्नाचा वास किंवा चव नीट समजत नाही आणि त्याचे पोट लवकर भरते.

३) आई बाळाला स्तनपान देताना ऑक्सीटोसिन हा हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे आई आणि बाळामधील नाते अधिक घट्ट होते, त्याचप्रमाणे बाळाला दूध पाजल्याने केवळ हॅप्पी हार्मोन्सच रिलीज होत नाहीत तर त्याने अन्न व्यवस्थित पचण्यासही मदत होते.

४) तुमचे मूल ५ वर्षांपेक्षा लहान असल्यास स्क्रीन पाहताना त्यांना खाऊ घालणे टाळा. याचा त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो.

५) ५ वर्षांखालील मुलांना संपूर्ण पोषण मिळावे यासाठी, त्यांनी अन्न हाताने हाताळून पाहणे, त्याचा वास घेणे आणि नंतर ते हळूहळू चावणे महत्त्वाचे आहे.

६) मोबाईलमध्ये पाहत खाल्ल्याने ते गरजेपेक्षा जास्त खातात आणि यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढू शकतो .

७) त्याचबरोबर मुलांच्या पचनक्रियेवरही परिणाम होतो आणि शरीराला अन्नातून पोषक तत्वे मिळत नाहीत.