सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे. अनेक लोकांना बदलत्या वातावरणाचा त्रास होतो. त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यावर शिंका येण्याची समस्या अनेकांना जाणवते. तर काही लोकांना कोणताही ऋतु असला तरी शिंका येतात. तुम्हालाही सकाळी उठल्यावर सतत शिंका येत असतील तर तुम्हाला ऍलर्जीक राहिनाइटिसची समस्या आहे. सतत शिंका येण्याच्या या समस्येला मेडिकल सायन्सच्या भाषेत एलर्जिक राइनाइटिस (Allergic rhinitis) असं म्हटलं जातं.

शिंक का येते ?

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

अचानक हवामानातील बदल आणि धूळ, थंडी किंवा प्रदूषणामुळे ऍलर्जीक राहिनाइटिसची समस्या उद्भवते. अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवून या समस्येवर मात कशी करता येते ते जाणून घेऊया.

हेही वाचा- रोज चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडले आहेत? ‘हे’ घरगुती उपाय वापरून मिळवा त्यापासून सुटका

शिंक येण्याची कारणे –

हवेतील धुळीचे कण आणि धोकादायक घटक आपण श्वास घेतो त्यावेळी शरीरात जातात. आपले नाक असे घातक पदार्थ शरीरात जाण्यापासून रोखते. मात्र, त्यातूनही काही धुळीचे कण शरीरात जातात. ज्यामुळे शिंका येण्यास सुरूवात होते. अचानक बदललेले हवामान, थंडी वाढणे, परफ्युम, सिगारेटचा धूर यासह आपल्या शेजारी कोणी तंबाखू मळली तर अशा तीव्र वासाच्या गोष्टींमुळेही अनेकदा शिंका येतात.

शिंका यायला सुरुवात झाली की खालील समस्या जाणवतात –

हेही वाचा- सकाळी टाचांमध्ये वेदना जाणवतात? ‘ही’ असु शकतात कारणं; जाणून घ्या घरगुती उपाय

  • घसा खवखवणे
  • कोरडा खोकला
  • सर्दी
  • सतत डोकेदुखी
  • डोळ्यांखाली काळे डाग
  • थकवा येणे

शिंक येण्याच्या समस्येपासून बचाव करण्याचे ५ उपाय –


१ – १०-१२ तुळशीची पाने, १/४ चमचा काळी मिरी पावडर, दीड चमचे किसलेले आले आणि अर्धा चमचा वाइन रूट पावडर एक कप पाण्यात उकळवा. हे मिश्रण उकळल्यानंतर ते गाळून प्या. रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत हे मिश्रण प्यायल्याने तुम्हची शिंक येण्याच्या समस्येपासून सुटका होईल.

हेही वाचा- पोटात गॅस वाढवतात ‘या’ भाज्या; जेवताना फक्त ‘हे’ केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम

२ – तुम्हाला जर ऍलर्जीक राहिनाइटिसची समस्या जाणवत असेल तर हलके अन्न खाण्याची सवय लावा. आणि नेहमी कोमट पाणी प्या.

३ – अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यानेही या शिंक येण्याच्या त्रासापासून आराम मिळतो. हळदीमध्ये असलेले अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले घटक असतात ज्यामुळे आपणाला या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते.

४ – एक चमचा मधात थोडी आवळा पावडर मिसळून दिवसातून दोनदा सेवन करा. याशिवाय पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिल्यानेही शिंक येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

५ – एक लिटर पाणी उकळवा त्यामध्ये थोडा कापूर मिसळा आणि १० ते १५ मिनिटे वाफ घ्या. अशाप्रकारे दररोज वाफ घेतल्याने या समस्येपासून आराम मिळेल.