Health Tips: निरोगी यकृतासाठी 'या' मसाल्यांचे करा सेवन | Health Tips: Consume 'this' spices for a healthy liver | Loksatta

Health Tips: निरोगी यकृतासाठी ‘या’ मसाल्यांचे करा सेवन

औषधी वनस्पती आणि भारतीय मसाल्यांमुळे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.

Health Tips: निरोगी यकृतासाठी ‘या’ मसाल्यांचे करा सेवन
(फोटो: Pixabay)

Indian Herbs And Spices: भारतात मसाल्यांचे महत्त्व काय आहे हे वेगळ सांगण्याची गार्ज नाही. मसाल्यांशिवाय भारतात अन्न शिजवणे शक्य नाही. त्याच वेळी, औषधी वनस्पतींना भारतात एक मनोरंजक इतिहास आहे. औषधी वनस्पती आणि भारतीय मसाल्यांमुळे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. आज १० जून रोजी अमेरिकेत, राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मसाले दिवस साजरा केला जातो. अमेरिकेत, हा दिवस २०१५ मध्ये सुरू झाला आणि त्याचा उद्देश औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे महत्त्व आणि फायद्यांशी संबंधित माहिती सामायिक करणे हा आहे.

आपल्या शरीराच्या पचन, चयापचय आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रक्त शुद्ध करणारे मसाले किंवा औषधी वनस्पतींसह तुम्ही यकृत निरोगी ठेवू शकता. यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही कोणते मसाले आणि औषधी वनस्पतींची मदत घेऊ शकता ते जाणून घ्या.

(हे ही वाचा: फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा ‘या’ टिप्स)

हळद (Turmeric)

औषधी गुणधर्म असलेल्या हळदीचा उपयोग औषध म्हणून प्राचीन काळापासून केला जातो. त्याचे दाहक-विरोधी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आपल्या यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात. हळदीचा तुकडा घ्या आणि एका ग्लास पाण्यात उकळा आणि सकाळी हे पाणी प्या. हे डिटॉक्सिफायिंग ड्रिंक म्हणून काम करेल.

(हे ही वाचा: Paneer vs Tofu : पनीर आणि टोफूमध्ये काय आहे फरक?)

त्रिफळा (Triphala)

आयुर्वेदात असे सांगितले आहे की त्रिफळा देखील शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. ही एक प्रकारची पावडर आहे, जी आवळा, बहेडा आणि इतर औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केली जाते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत घ्या. यामुळे यकृताची कार्य क्षमता सुधारेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या त्रिफळा गोळ्याही खाऊ शकता.

(हे ही वाचा: Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते? जाणून घ्या)

अश्वगंधा (Ashwagandha)

ही एक प्रकारची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी केवळ यकृतासाठीच नाही तर शरीराच्या इतर भागांसाठीही फायदेशीर मानली जाते. याचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि नैसर्गिकरित्या एन्झाईम्सचे उत्पादन वाढू शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अश्वगंधा पावडरही खाऊ शकता.

(हे ही वाचा: Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगबद्दल असलेली ‘ही’ मिथक आणि तथ्य जाणून घ्या)

लसूण (Garlic)

जेवणाची चव वाढवणारा लसूण यकृत निरोगी ठेवण्यासाठीही सर्वोत्तम मानला जातो. लसूणमध्ये यकृत डिटॉक्स करण्याची क्षमता असते. यात यकृतासाठी आवश्यक अँटी-ऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दररोज भाज्यांमध्ये लसूण वापरावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2022 at 14:56 IST
Next Story
सुपारीच्या पानांचे तेल चेहरा आणि केसांसाठी आहे अमृत ; जाणून घ्या बनविण्याची सोपी पद्धत