राग तर प्रत्येकालाच येतो. पण असेही काही लोक असतात, जे विनाकारण कोणत्याही गोष्टींवरून चिडचिड करतात. हा त्यांचा स्वभाव असला तरीही याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. चुकीची किंवा वाईट जीवनशैली आणि सतत व्यस्त राहिल्यामुळेही व्यक्तीची चिडचिड होऊ शकते. मात्र प्रत्येक वेळी रागवरील नियंत्रण सुटणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. रागामुळे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावरच नाही तर शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा खूप राग येणे हे अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. हे आपल्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच अशा व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अनेक अध्ययनातून हे सिद्ध झाले आहे की सतत प्रमाणाच्या बाहेर राग येत असेल तर संबंधित व्यक्तीला गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. हे आजार कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

रागामुळे ‘या’ दोन गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो

  • ब्रेन स्ट्रोक

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, राग हे ब्रेन स्ट्रोकचेही कारण असल्याचे मानले जाते. जे लोक जास्त रागावतात त्यांना ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका तीन पटीने वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा धोका कमी करण्यासाठी लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. अन्यथा यासारखे इतर अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

  • हृदयविकार

जे लोक सतत रागावतात, तसेच ज्यांचे आपल्या रागावर नियंत्रण नसते, अशा लोकांना गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्याचप्रमाणे, अनेक संशोधकांच्या मते, अशा व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर चिडचिड झाल्यास त्यांना दोन तासांच्या आत, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जवळपास पाच पटीने वाढतो. त्यामुळे हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Photos : भाजलेला कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील; अनेक अवयवांसाठी आहे गुणकारी

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे उपाय

जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तुम्ही का रागावला आहात याची कारणे ओळखण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला या कारणांपासून दूर करा. त्याचबरोबर तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला राग आला असेल तर अशा वेळी दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा आणि वाद घालणे टाळा. तसेच ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहिती करीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips do you also get angry for no reason these serious diseases can happen learn rescue methods pvp
First published on: 19-09-2022 at 14:41 IST