लघवी तुमच्या शरीरातील विषारी आणि निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे प्रामुख्याने पाणी, मीठ, पोटॅशियम, फॉस्फरस, युरिया, युरिक ऍसिड, इलेक्ट्रोलाइट्स यांसारख्या रसायनांनी बनलेले आहे. जेव्हा मूत्रपिंड आपल्या रक्तातील विषारी आणि अन्य निरुपयोगी पदार्थ फिल्टर करतात तेव्हा ते लघवीची निर्मिती करतात. आपल्या आरोग्यासाठी वेळोवेळी अशा पदार्थांचे शरीराबाहेर पडणे अतिशय आवश्यक आहे. मात्र काही लोकांना रात्रीच्या वेळी सतत लागावी होण्याची समस्या असते.

वेबएमडीच्या मते, रात्रीच्या वेळेस वारंवार लघवी होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. हे आरोग्याच्या इतर समस्यांचे लक्षणदेखील असू शकते. जर तुम्ही रात्री ६ ते ८ तास लघवी न करता झोपत असाल तर ठीक आहे. पण जर तुम्हालाही रात्री २ ते ३ पेक्षा जास्त वेळा लघवी होण्याची तक्रार असेल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे.

If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

Diabetes Tips : टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी एका दिवसात किती फायबर आवश्यक? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

रात्री वारंवार लघवी होण्याची कारणे

रात्री वारंवार लघवी होण्याची कारणे जीवनशैली किंवा वैद्यकीय परिस्थितीही असू शकतात. वृद्ध लोकांमध्ये, रात्री जागणे आणि लघवी करण्यासाठी अनेक वेळा उठणे सामान्य आहे. जर तुमचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण रात्री वारंवार लघवी केल्याने तुमची झोप नीट होत नाही आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. खालील कारणांमुळे रात्री वारंवार लघवीला होऊ शकते.

  • मधुमेह
  • चिंता
  • अवयव निकामी होणे
  • प्रोलॅप मूत्राशय
  • मूत्रपिंड संसर्ग
  • ओव्हरएक्टिव्ह मूत्राशय सिंड्रोम (ओएबी)
  • मूत्राशय, प्रोस्टेट किंवा ओटीपोटात ट्यूमर
  • पायाच्या खालील भागांना सूज येणे
  • न्यूरोलॉजिकल विकार
  • मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग

Health Tips : तुम्हालाही खूप राग येतो? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या बचावाच्या पद्धती

औषधांचे दुष्परिणाम

काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळेही ही समस्या उद्भवू शकते. हे विशेषतः मूत्रवर्धक गोळ्या घेण्याचा परिणाम असू शकतो. उच्च रक्तदाबाच्या गोळ्यांमुळेही लघवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोणतेही औषध घेताना काळजी घ्या कारण त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चुकीची जीवनशैली

अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पेये जास्त प्रमाणात प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढू शकते. याचा अर्थ असा की ते प्यायल्याने तुमच्या शरीरात जास्त लघवी निर्माण होते. मोठ्या प्रमाणात अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पेये सेवन केल्याने रात्री झोपण्यास त्रास होऊ शकतो आणि लघवी करण्यास त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना रात्री उठून लघवी करण्याची सवय असते त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो.

Relationship Tips : नात्यातील प्रेम निरंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्यावी

जास्त लघवी होत असल्यास काय करावे?

रात्री वारंवार लघवी करण्याचे परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय वापरू शकता. तुम्ही मद्यपान करत असाल, तर झोपेच्या २ ते ४ तास आधी अल्कोहोलचे सेवन कमी केल्याने रात्री वारंवार लघवी होण्यास प्रतिबंध होतो. अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पेये टाळणे देखील मदत करू शकते. याशिवाय तुम्ही झोपण्यापूर्वी लघवी करू शकता. केगल व्यायाम आणि पेल्विक फ्लोअर फिजिकल थेरपी तुमच्या पेल्विक स्नायूंना बळकट करण्यात आणि मूत्राशय नियंत्रण सुधारण्यास मदत करू शकतात.

या समस्येचा उपचार सहसा मूळ कारणावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला स्लीप एपनिया असल्यास, तुम्हाला स्लीप स्पेशालिस्ट किंवा पल्मोनोलॉजिस्टकडे पाठवले जाऊ शकते. प्रोस्टेट वाढल्याचे कारण असल्यास, औषधे किंवा शस्त्रक्रिया आवश्यक असू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)