Health Tips : तुम्हालाही खूप घाम येतो का? तर आजच आहारात करा ‘हे’ बदल

प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे सामान्य नाही. जास्त वजन, बीपी आणि डायबिटीजची समस्या हे देखील याचे कारण असू शकते.

tips to reduce sweating
जर तुम्ही देखील या समस्येशी लढत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात बदल करायला हवा. (Photo : Pexels)

कडक उन्हाळ्यात शरीराला सर्वाधिक घाम येतो. घाम येणे सामान्य असले तरीही प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे सामान्य नाही. याची एक नाही तर अनेक कारणे आहेत. जास्त वजन, बीपी आणि डायबिटीजची समस्या हे देखील याचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील या समस्येशी लढत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात बदल करायला हवा.

असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने घामाची समस्या कमी होऊ शकते. आज आपण जाणून घेऊया की जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो तेव्हा तुमच्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत?

शरीरातून जास्त घाम येत असेल तर या पदार्थांचे सेवन करा

  • कॅल्शियमयुक्त पदार्थ खा

मजबूत हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील कॅल्शियम फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. यासाठी दूध, दही आणि तीळ खावे.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • अळशीच्या बियांचे सेवन करा

अळशीच्या बियांचे फायदे तुम्ही ऐकलेच असतील. केसगळतीची समस्या कमी करण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरीकडे, जर तुमच्या शरीरातून जास्त घाम येत असेल तर तुम्ही त्याचे सेवन करावे.

  • पुरेसे पाणी प्या

जास्त घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी पुरेसे पाणी प्यावे. पाण्याने शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे घामाची समस्या कमी होऊ शकते, म्हणूनच दिवसातून फक्त ७ ते १० ग्लास पाणी प्या.

जास्त घाम येत असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका

  • घामाची समस्या वाढू नये म्हणून मसालेदार अन्न कमी खावे.
  • कॅफिनचे सेवन कमी करा. याचे जास्त सेवन केल्याने जास्त घाम येतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health tips do you sweat too much so change your diet today to reduce sweating pvp

Next Story
Health Tips : झिंकची कमतरता भासल्यास शरीर देते ‘हे’ संकेत; चुकूनही करू नका दुर्लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी