पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हृदयापासून त्वचेपर्यंत सर्व अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शरीरासाठी उपयुक्त ठरणारे पाणी जेवताना प्यायचे की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जेवताना पाणी प्यायल्याने काय होऊ शकत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरोगी शरीरासाठी दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते. पाण्यामुळे शरीरातील हानीकारक पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. जरी पाण्याचे अनेक फायदे असले तरी जेवताना पाणी प्यायल्यास शरीरासाठी ते कधी कधी नुकसानदायक ठरू शकते. आयुर्वेदानुसार जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते आणि वजन देखील वाढू शकते. यावर तज्ञांचे काय मत आहे हे जाणून घेऊया.

Health Tips : दररोज केळी खाल्याने शरीरात होतात ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल

जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढते का?

पाणी अन्नाचे विघटन करण्यास मदत करते, जेणेकरून पोषक तत्त्वे आपल्या शरीरामध्ये नीट शोषली जातील. काहीजण पचनक्रियेशी संबंधित समस्यांमुळे जेवताना पाणी पिणे टाळतात. पण तज्ञांच्या मते जेवताना आपण थोडे पाणी पिऊ शकतो. ते शरीरासाठी हानिकारक नाही. तसेच जेवताना थोडे पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही.

जेवताना साधे पाणी पिण्यापेक्षा त्यामध्ये लिंबू पिळल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते. अशाप्रकारे तुम्ही जेवताना थोड्या प्रमाणात पाणी पिता येऊ शकता. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता नाही.

आणखी वाचा – ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये मुलांच्या गोंधळात काम करता येत नाहीए? त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी या गोष्टी करून पाहा

पाणी पिण्याचे फायदे

  • पाणी पेशींना पोषक तत्वे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते.
  • मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते
  • पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते, परिणामी शरीर निरोगी राहते.
  • पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips does drinking water while eating increase weight find out pns
First published on: 16-08-2022 at 12:15 IST