केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळं हे उत्तम फळ आहे. पण तज्ञांच्या मते अतिप्रमाणात केळी खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही रोज केळी खात असाल तर त्यामुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच केळी खाण्याचे योग्य प्रमाण काय आहे हेदेखील जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तज्ञांच्या मते रोज दोन-तीन केळी खाणे शरीरासाठी योग्य आहे. पण याहून अधिक केळी खाल्ल्याने आरोग्याबाबत समस्या उद्भवू शकते. दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घेऊया.

आणखी वाचा – तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सफरचंद खाल्ल्यानेही वाढू शकतं वजन; जाणून घ्या या मागील नेमकं कारण

वजन कमी होऊ शकते

केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर उपलब्ध असते. त्यामुळे खूप वेळ पोट जड जाणवते आणि लवकर भुक लागत नाही. परिणामी वजन कमी होण्याची शक्यता असते.

आळस येणे

केळ्यांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळतात, जे स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे जर तुम्ही दिवसभर केळी खाल्ली तर तुम्हाला संपुर्ण दिवस आळस येईल आणि झोपावेसे वाटेल.

शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर

दररोज तुम्ही फक्त एक केळ जरी खाल्ले तरी त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळण्यास मदत होते. खेळाडूंना दररोज केळी खाणे फायद्याचे ठरू शकते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लाभदायक

केळीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती सुधारते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी मेंदूची कार्यशीलता गतिमान करते. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.

त्वचेत सुधारणा होते

दररोज केळी खाल्याने शरीरातील कोलेजनचे निर्मिती होण्यास हळूहळू सुरूवात होते. ज्यामुळे त्वचा आणखी सतेज होते आणि तुम्ही अधिक तरुण दिसू शकता.

Health Tips : गरोदरपणात ५०% महिलांना होतो टाइप २ मधुमेह; जाणून घ्या याची कारणे आणि बचाव पद्धती

रक्ताच्या पातळीत वाढ होते

केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळते. त्यामुळे दररोज केळी खाल्याने रक्ताची कमतरता असल्यास ती पूर्ववत होण्यास हळूहळू सुरूवात होते.

अशाप्रकारे दररोज केळी खाण्याचे हे फायदे आहेत, तसेच जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे तोटे देखील आहेत. तज्ञांच्या मते एका दिवसामध्ये एक ते तीन केळी खाल्ल्याने त्याचे फायदे मिळू शकतात, त्यापेक्षा जास्त केळ्यांचे सेवन केल्यास समस्या उद्भवू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips eating banana every day makes these significant changes in the body pns
First published on: 15-08-2022 at 19:28 IST