scorecardresearch

Health Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही पदार्थांच्या अतिसेवनाने आपल्या स्वभावात बदल होऊ शकतो. जाणून घेऊया, हे पदार्थ कोणते आहेत.

Health Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन
आहारातील काही पदार्थही आपल्या स्वभावावर परिणाम करू शकतात. (Photo : Freepik)

काही माणसे अशी असतात की त्यांना लगेच राग येत नाही. मात्र काही लोक लहान-लहान गोष्टींवरून लगेचच चिडतात. राग येण्याची अनेक करणे असू शकतात. जसे की, आर्थिक समस्या, कौटुंबिक किंवा कार्यालयीन तणाव इत्यादी. मात्र आपल्या आहारातील काही पदार्थही आपल्या स्वभावावर परिणाम करू शकतात. म्हणजेच काही पदार्थांच्या सेवनाने आपला राग वाढू शकतो.

आपण आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतो, त्यांचा आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या स्वभावावरही मोठा फरक पडत असतो. विशिष्ट पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म असतात. काही पदार्थांचा गुणधर्म थंड असतो तर काहींचा उष्ण. पदार्थांचे हे गुणधर्म आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही पदार्थांच्या अतिसेवनाने आपल्या स्वभावात बदल होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊया, हे पदार्थ कोणते आहेत.

Photos : पावसाळ्यात चहाबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; आरोग्याला होऊ शकतो अपाय

  • टोमॅटो

टोमॅटो एक अशी भाजी आहे ज्याशिवाय आपण बनवलेल्या पदार्थाची चव अपूर्ण राहते. हे खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि माणसाला राग येऊ शकतो. ज्यांना लवकर राग येतो त्यांनी टोमॅटो कमी खावेत.

  • फ्लॉवर

फ्लॉवर खाल्ल्याने तुमच्या शरीरात एक्सा हवा तयार होऊ लागते, त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा धोका असतो आणि हेच तुमच्या रागाचे कारण बनते. हीच समस्या ब्रोकोलीच्या बाबतीत उद्भवते.

  • वांगे

वांग्यामध्ये आम्लयुक्त पदार्थ जास्त असतात ज्यामुळे तुमच्या मनात राग निर्माण होतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला राग येऊ लागला, तर हे खाणे कमी करा.

तुम्हीही जास्त वेळ बसून काम करत असाल, तर वेळीच व्हा सावध; हृदयविकारासह वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

  • सुका मेवा

अनेक आरोग्य तज्ञ चांगल्या आरोग्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात, परंतु ते राग देखील वाढवू शकतात. त्यामुळे मनात राग असताना ते न खाणे चांगले.

  • रसाळ फळ

काकडी आणि टरबूज खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेट राहते, परंतु राग वाढण्यास ते देखील कारणीभूत ठरू शकते. तणावाखाली असाल तर ही रसदार फळे खाऊ नका.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health tips eating these foods can cause anger passionate people should not consume at all pvp