scorecardresearch

Health Tips For Kids : लहान मुलांना दुधासह ‘हे’ ४ पदार्थ खायला देणे टाळा, अन्यथा वाढतो ‘या’ आजारांचा धोका

पालकांना मुलांना दूध पिण्यासाठी देण्याआधी त्यासोबत कोणत्या गोष्टी दिल्या नाही पाहिजेत जाणून घ्या.

milk and this food combination harmful for kids health
लहान मुलांना दुधासोबत हे पदार्थ खाण्यास देऊ नका ( (Photo : Freepik)

Children Health Tips : नवजात बालकापासून ते मोठ्या मुलांपर्यंत दूध प्रत्येकाचे एक मुख्य अन्न आहे. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनसारखे अनेक पोषक तत्वांचा दूध हा महत्वाचा स्त्रोत आहे. अनेक लहान मुलं दूध आवडीने पितात. परंतु दूध पिताना मुलांनी त्यासोबत काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. पालकांनी मुलांना दुधासोबत ते पदार्थ दिले नाही पाहिजेत. लहान मुलं दूधासोबत असे काही पदार्थ खातात, ज्या पदार्थ्यांच्या संयोगामुळे एकप्रकारे विष तयार होते. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, त्यामुळे दूधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये जाणून घ्या.

दूध आणि आंबट फळे

लहान मुलांना दूधासोबत आंबट फळं, आंबट पदार्थ खायला देणे टाळले पाहिजे. मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दूधातील प्रथिने जमा होतात आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, पोटात पेटके येणे, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्याऐवजी, पालक त्यांच्या मुलांना दूध न देता पर्याय म्हणून एक ग्लास संत्र्याचा रस किंवा इतर आंबट फळांचा रस देऊ शकतात.

हेही वाचा : Milk Benefits: दूध कच्चं प्यावं की उकळलेलं? आरोग्यासाठी कोणतं फायदेशीर, वाचा

दूध आणि खारट पदार्थ

पालकांनी आपल्या मुलांना दूधसोबत खारट पदार्थ देणे टाळले पाहिजे. जसे की, चिप्स, वेफर्स आणि इतर खारट स्नॅक्स देणे टाळावे. हे खारट पदार्थ दूधासोबत खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे दूध पचण्यास अडचणी येतात. अशा परिस्थिती गॅस्टोइंटेस्टाइनलसह इतर शारीरिक अस्वस्थता होई शकते. त्याऐवजी, पालक आपल्या मुलांना एक ग्लास पाणी किंवा फळं, भाज्या यांसारखा निरोगी नाश्ता देऊ शकतात.

दूध आणि खरबूज

दूध हे एक प्रकारचे अन्न आहे ज्यामध्ये प्रोटीन आणि भरपूर फॅट असते. टरबूज आणि कस्तुरी-खरबूज एकत्र केल्याने त्यातील ऍसिड आणि दुधातील प्रोटीन एकत्र येतात. यामुळे दूध आंबू शकते. जेव्हा हे मिश्रण तुम्ही एकत्र खाता तेव्हा पचनसंस्था आणि इतर समस्या उ्द्भवू शकतात. यामुळे आजारपणाची भावना निर्माण होते.

दूध आणि द्राक्षे

जर तुम्ही द्राक्ष खाण्याचा विचार करत असाल तर त्यानंतर तासभर दूध पिणे टाळा. यामागील कारण म्हणजे दुधात असलेले प्रोटीन द्राक्षांच्या आम्लयुक्त स्वभावाच्या आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन सीच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यावर आंबते. या संयोगामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, शारीरिक अस्वस्थता, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.

पालकांनी, त्याऐवजी त्यांच्या मुलांना चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळत आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ आणि पेये द्यावीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:40 IST

संबंधित बातम्या