जेव्हा जेव्हा निरोगी अन्न किंवा पोषक तत्वांचा विचार केला जातो तेव्हा लोक सहसा प्रथिने, कॅल्शियम किंवा जीवनसत्त्वे याबद्दल बोलतात. परंतु शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ नये म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. या अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांपैकी एक म्हणजे जस्त म्हणजेच झिंक. जे आपल्याला अन्नातून मिळते. त्याच वेळी, बरेच लोक ते पूरक स्वरूपात देखील घेतात. झिंक हे एक अत्यावश्यक खनिज आहे जे तुमच्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही कारणांमुळे शरीरात झिंकची कमतरता असल्यास. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.दुसरीकडे झिंकच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातही अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत शरीरात झिंकची कमतरता असल्यास शरीर कोणत्या प्रकारचे संकेत देते, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

झिंकची कमतरता असताना शरीर देते हे संकेत

  • पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम

झिंकच्या कमतरतेमुळे पुरुषांना अनेक समस्या निर्माण होतात. शरीरातील झिंकच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांनी, आपण पुरेशा प्रमाणात झिंकचे सेवन करत आहोत ना, याकडे लक्ष द्यायला हवे.

  • केस गळणे

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात झिंकची तीव्र कमतरता असते तेव्हा केस गळायला लागतात. अशावेळी टक्कल पाडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमचेही केस गळत असतील तर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता असू शकते. अशावेळी आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि आहारात बदल करा.

  • कमकुवत रोगप्रतिकारशक्ती

शरीराच्या अनेक कार्यांसाठी झिंक खूप महत्वाचे आहे, ते शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आजारी पडण्यापासून वाचवते. पण जर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता असेल तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते.

Blood Sugar : वयाच्या ६० वर्षांनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या वयोमानानुसार प्रमाण

झिंकने समृद्ध पदार्थ कोणते हे जाणून घेऊया

  • तीळ

तीळ काळा असो वा पांढरे, यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे अ आणि क वगळता सर्व आवश्यक पोषक घटक असतात. तीळामध्ये झिंकसह व्हिटॅमिन बी ६ आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते.

  • बाजरी

आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहीत असेल की बाजरीमध्ये सुपर न्यूट्रिएंट्स आणि झिंक भरपूर असतात. याशिवाय, त्यात प्रथिने आणि फायबर देखील पुरेशा प्रमाणात आढळते. बाजरीचे सेवन फक्त पोट भारण्यासाठीच केले जात नाही तर आयुर्वेदात औषध म्हणूनही वापरले जाते. खाण्याची इच्छा वाढवण्यासोबतच, त्याचे औषधी गुणधर्म वेदना, पोटाशी संबंधित आजार दूर करण्यासाठी आणि संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहेत.

  • पनीर

पनीरला प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून ओळखले जाते. पण दूध, दही आणि पनीर यासारख्या सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांच्या सोबतच झिंकही आढळते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही शरीरातील झिंकच्या कमतरतेवर मात करू शकता.

  • काळे चणे

काळा चणे हे पोषक तत्वांनी भरपूर असतात. त्यात भरपूर प्रथिनांसह झिंक पुरेशा प्रमाणात आढळते. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रित करते आणि वजन नियंत्रित करून स्नायूंना मजबूत बनवते.

Heart Attack: चेहऱ्याच्या ‘या’ भागांमधील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा इशारा

  • राजगिरा

राजगिऱ्याचे सेवन सहसा उपवासात केले जाते. राजगिऱ्यामध्ये जस्त, प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दररोज एक वाटी दुधात राजगिरा मिसळून याचे सेवन केल्याने तुम्ही त्याचे आरोग्य फायदे मिळवू शकता आणि झिंकची कमतरता दूर करू शकता.

  • डार्क चॉकलेट

१०० ग्रॅम चॉकलेटमध्ये ३० टक्के आरडीए झिंक असते. अशा स्थितीत शरीरातील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन मर्यादित प्रमाणात करू शकता.

  • मशरूम

मशरूममध्ये कॅलरी कमी आणि प्रथिने भरपूर असतात. शिवाय त्यामध्ये झिंक पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मशरूम देखील व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात. आणि हे हार्मोनल फंक्शन देखील संतुलित करते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in case of zinc deficiency the body gives this signal dont ignore this by mistake pvp
First published on: 24-06-2022 at 14:20 IST