जपानी लोकांना आपली जीवनशैली निरोगी कशी ठेवावी हे पुरेपूर माहित आहे. जेवणाच्या चांगल्या सवयीनमुळेच त्यांना पोटासंबंधी तक्रारी जाणवत नाहीत. अन्न हळूहळू चावून खाणे, आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश, ग्रील केलेले, वाफवलेले किंवा उकळलेले अन्न खाणे आणि वेळेवर अन्न खाणे या त्याच्या चांगल्या सवयींपैकी एक आहेत. एवढेच नाही तर निरोगी राहण्यासाठी ते भरपूर चालतात. आपणही जपानी लोकांच्या खाण्याच्या सवयी आत्मसात केल्या तर आपण सहज निरोगी राहू शकतो. आपण जपानी लोकांकडून कोणत्या चांगल्या खाण्याच्या सवयी शिकल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

जेवणासाठी चॉपस्टिक्सचा वापर करणे : जपानी लोक चॉपस्टिक्सच्या मदतीने जेवण करतात. यामुळे अन्न कमी प्रमाणात खाल्ले जाते ज्यामुळे त्यांचे पचन व्यवस्थित होते. भारतीयांनी देखील जपानी लोकांप्रमाणे जेवण केल्यास पचनक्रिया सुधारेल आणि अन्न सहज पचेल.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

उच्च पौष्टिक आहार घेणे : जपानी लोक उच्च पौष्टिक आहार घेतात. सर्वसाधारणपणे, जापानी लोकांच्या ताटामध्ये भात आणि हिरव्या भाज्या असतात ज्या ग्रील्ड, वाफवलेल्या किंवा उकडलेल्या असतात. हा आहार पचायला अत्यंत सोपा असतो आणि त्यामुळे पोट निरोगी राहते.

आहारात सिक्रेट इंग्रीडिएंटचा वापर : जपानी लोक आपल्या आहारात अशा सिक्रेट इंग्रीडिएंटचा वापर करतात ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. यामध्ये मुख्यतः व्हिनेगरचा समावेश असतो. याचा वापर लोणचे आणि सलाडमध्ये केला जातो. यातील आर्क्टिक अ‍ॅसिडमुळे चरबी विरघळते आणि शरीर निरोगी राहते.

आहारात सूपचा समावेश करणे : जपानी लोक जेवणात सर्वात जास्त सूप पितात. मिसो सूपपासून ते नूडल सूपपर्यंत असे अनेक जपानी सूप आहेत जे अतिशय आरोग्यदायी तसेच खायला चवदार आहेत. सूप खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि ऊर्जाही मिळते. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी सूपचे सेवन केले जाते.

रात्री लवकर जेवणे : रात्री लवकर जेवण करणे ही चांगली सवय आहे आणि जपानी लोक या तंत्राचा अवलंब करून निरोगी राहतात. बहुतेक जापानी लोक रात्रीचे जेवण सातच्या आत पूर्ण करतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. आपणही लवकर जेवण्याची सवय लावून घ्यावी.

आहारात ग्रीन टीचा समावेश : जपानी लोक मुख्यतः ग्रीन टीचे सेवन करतात जे शरीरासाठी खूप चांगले असते. ग्रीन टी पोटाची चरबी कमी करते, वजन नियंत्रणात ठेवते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

सायकल चालवणे किंवा चालणे : अन्न पचवण्यासाठी सायकल चालवणे आणि चालणे आवश्यक आहे. जपानी लोकांना अन्न पचवण्यासाठी सायकल चालवण्याची किंवा चालण्याची सवय आहे. असे केल्याने अन्न लवकर पचते.