No Salt After 7 PM for 21 Days: जेवणात जर मीठ नसेल तर जेवणाची चव चांगली लागत नाही. मीठ जेवणाची चव वाढवते पण त्याचे मर्यादित सेवन आरोग्यासाठी पुरेसे असते. बऱ्याचदा लोक दिवसभर काहीही खातात पण रात्रीचे जेवण मोठ्या उत्साहात बनवतात. रात्रीच्या जेवणात ते मीठाने परिपूर्ण असे लोणचे, पापड, चाट आणि मीठ वापरतात. एवढंच नाही तर संध्याकाळी खाण्याव्यतिरिक्त जर त्यांना भूक लागली तर ते लगेच चिप्स, खारट बिस्कीटे आणि स्नॅक्ससारखे पॅक केले अन्न खातात. संध्याकाळी सातनंतर आहारात मीठाचे सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्व डॉ. हंसा योगेंद्र यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जास्त मीठ तुमचे आरोग्य खराब करते. तज्ज्ञ सांगतात की, संध्याकाळी सातनंतर २१ दिवस मीठ टाळण्याचा संकल्प केल्याने तुमचे शरीर आकार घेण्यास आणि तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक आणण्यास मदत होईल.
रात्री मीठ खाल्ल्याने शरीरात गरजेपेक्षा जास्त सोडियम जमा होते आणि शरीराला सहन करण्यासाठी अतिरिक्त पाणी शोषले जाते. यामुळे द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि किडनीवर दबाव येतो. अनेकांना ही क्रिया कळतच नाही. मात्र संशोधनातून असे दिसून आले आहे की, मीठ कमी केल्याने काही आठवड्यात सिस्टोलिक रक्तदाब ४ ते ५ मिमीएचजीने कमी होऊ शकतो. रात्री मीठ खाणे हानिकारक का आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ… २१ दिवस मीठ न खाल्ल्यास आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात याबाबत जाणून घेऊ…
रात्री मीठ हानिकारक का आहे?
सूर्यास्तानंतर शरीर नैसर्गिकरित्या थंड आणि दुरूस्तीच्या स्थितीत जाते. हृदयाचे ठोके मंदावतात, पचन सोपे होते आणि किडनी विश्रांतीच्या स्थितीत कार्य करतात. तसंच झोपण्यापूर्वी मीठ घेतल्यास शरीर विश्रांतीऐवजी दुरूस्तीच्या स्थितीत जाते. म्हणूनच काही लोकांना रात्री वारंवार तहान लागते, काहींचे हृदय धडधडते आणि बरेच लोक सकाळी डोळे आणि चेहरा फुगवून उठतात.
तज्ज्ञ सांगतात की, संध्याकाळी उशिरा सोडियमचे सेवन केल्याने रात्री रक्तदाब किंचित कमी करण्याच्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. याला नॉक्टर्नल डिपिंग म्हणतात. जेव्ही ही घट होत नाही तेव्हा हृदयाला आवश्यक असलेली विश्रआंनी मिळत नाही. ही सवय कालांतराने शरीरावर हळूहळू ताण वाढवते.
संध्याकाळी मीठ सोडल्यानंतर आरोग्यात कोणते बदल होतात?
संध्याकाळी सातनंतर भाज्या किंवा डाळीमध्ये जास्त मीठ घालू नका. रात्रीचे जेवण हलके आणि साधे ठेवा. रात्री खिचडी, भाज्यांचे सूप किंवा चपाती-भाजी. चवीसाठी मीठाऐवजी जिरे, हिंग, काळी मिरी, धने किंवा कढीपत्ता वापरा. जर तुम्ही संध्याकाळी सातनंतर मीठाचे सेवन कमी केले तर तुम्हाला गाढ झोप येईल. कमी मीठ खाल्ल्याने रात्री तहान कमी होते. वारंवार बाथरूममध्ये जाण्याची गरज नसते आणि हृदयाचे ठोके शांत राहतात. रातरी पापड, लोणचे, पकोडे, चिप्स आणि चटणी यासारख्या गोष्टी खाणे टाळा. रात्री ७ ते ८च्या दरम्यान जेवण संपवण्याचा प्रयत्न करा. फक्त ७ दिवसांसाठी हे करून पहा, तुम्हाला स्वत:ला फरक जाणवेल.
- जर तुम्ही कमी मीठ खाल्ले तर सकाळी तुम्हाला हलके वाटेल, त्यामुळे सूज येणे आणि चेहऱ्यावरील सूज कमी होईल. कमी मीठ असलेले जेवण पचायला सोपे असते आणि रक्तदाब सामान्य ठेवते. हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना सकाळी शांत वाटते.
- आहारातील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, संध्याकाळी सोडियमचे प्रमाण फक्त ३० टक्के कमी केल्याने काही दिवसांतच पाण्याचे संतुलन आणि सकाळची ऊर्जा सुधारू शकते.
- जर तुम्ही २१ दिवस सतत संध्याकाळी सातनंतर मीठ कमी करण्याची सवय लावली तर काहीही न करता तुम्हाला झोपेत सुधारणा, पचन, सकाळचा ताजेपणा आणि रक्तदाब सामान्यीकरण असे बदल जाणवतील.
कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे?
- ज्या लोकांना आधीच कमी रक्तदाब आहे त्यांनी अचानक मीठ सेवन थांबवू नये, तर हळूहळू ते कमी करावे. वृद्ध लोकांनी दिवसा भरपूर पाणी प्यावे, अन्यथा रात्री मीठ कमी केल्याने अशक्तपणा येऊ शकतो.
- मीठ पूर्णपणे टाळू नका. तुमचा दैनंदिन आहार संतुलित असावा. मीठाचे सेवन कमी करण्याच्या प्रयत्नात जास्त साखरयुक्त पदार्थ खाणे देखील एक वाईट सवय बनू शकते.
- तुमच्या शरीराच्या हायड्रेशनचा गरजा पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी ६ ते ७च्या दरम्यान कोमट पाणी प्या. तुमचे शेवटचे जेवण शांत बसून घ्या, टीव्ही पाहताना किंवा मोबाईल फोन वापरताना नाही. जेवणानंतर १० मिनिटे हलके चालणे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
- जेवणानंतर तीन मिनिटे वज्रासनाचा सराव करा आणि नंतर झोपण्यापूर्वी पाच खोल, हळू श्वास घ्या. दिवसाच्या शेवटच्या तासात तुमचे शरीर शांत आणि थंड होण्यासाठी दिवे मंद ठेवा.
झोपण्यापूर्वी आपण काय खातो आणि काय विचार करतो यावर आपल्या झोपेची गुणवत्ता अवलंबून असते. संध्याकाळी सातनंतर मीठाचे सेवन कमी करणे हा शरीराच्या नैसर्गिक लयीचा आदर करण्याचा एक मार्ग आहे. यामुळे किडनीला विश्रांती मिळते आणि हृदय शांत राहते. अशा छोट्या सवयी हळूहळू आपल्याला अधिक नैसर्गिक आणि संतुलित जीवनाकडे घेऊन जातात.

