Health Tips : कलिंगडाच्या सालीचा रस पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे | Health Tips: There are amazing benefits to drinking watermelon peel juice | Loksatta

Health Tips : कलिंगडाच्या सालीचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

कलिंगडाची साले आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Health Tips : कलिंगडाच्या सालीचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
कलिंगडाच्या सालीपासून तयार केलेला रस शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. (Photo : Pexels)

उन्हाळ्यात कलिंगड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. पण तुम्ही कधी कलिंगडाच्या सालीचा रस प्यायला आहात का? कलिंगडाच्या सालीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने तुम्ही लठ्ठपणा ते शरीराला हायड्रेट ठेवण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करू शकता. याशिवाय कलिंगडाच्या सालीपासून तयार केलेला रस शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कलिंगडाची साले आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कलिंगडाच्या सालीचा रस कसा तयार करावा?

सामग्री – एक वाटी कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग, लिंबू, जास्वंदीची फुले, काळे मीठ, मध

प्रक्रिया – सर्व प्रथम जास्वंदाची फुले सुकवून घ्या. यानंतर आता काही वेळ थंड होण्यासाठी राहू द्या. आता कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग कापून मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि ही फुले पाण्यात मिसळा. आता सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे बारीक करून घेतल्यावर त्यामध्ये मध आणि मीठ टाका. आता हा रस प्या.

कलिंगडाच्या सालीचा रस पिण्याचे फायदे

  • झोपेत सुधारणा

कलिंगडाच्या सालीमध्ये मॅग्नेशियम असते. याचे सेवन केल्याने चांगली झोप येते. रात्री चांगली आणि गाढ झोप येण्यासाठी कलिंगडाच्या सालीचा रस प्या.

  • वजन नियंत्रण

शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कलिंगडाच्या सालीचा रस प्या. त्यात मेटाबॉलिज्म वाढवण्याचा गुणधर्म आहे. जे तुमच्या शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकतात.

  • त्वचा आणि केसांसाठी गुणकारी

कलिंगडाच्या सालीपासून तयार केलेला रस वजन कमी करण्यासोबत त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी मानला जातो. त्यात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे त्वचा आणि केसांसाठी खूप महत्वाचे आहे.

  • शरीर हायड्रेटेड ठेवते

उन्हाळ्यात कलिंगडाच्या सालीचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने वाटते. तसेच, जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास असेल तर याच्या सेवनाने शरीर थंड होते.

(येथे देण्यात आलेली घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2022 at 12:25 IST
Next Story
आरोग्यवार्ता : प्रवासादरम्यान मळमळ, बद्धकोष्ठता टाळण्याचे उपाय