आंघोळ केल्यावर प्रत्येकाला छान आणि फ्रेश वाटते. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे अनेकदां दिवसातून दोन ते तीन वेळा अंघोळ करायचे. पण तुम्हाला माहीत आहे का की दिवसाऐवजी रात्री अंघोळ केल्याने तुम्हाला किती फायदे होतात. असे केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा सुंदर बनवण्यासाठी रात्रीची आंघोळही उपयुक्त ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया रात्री अंघोळ करण्याचे इतर कोणते फायदे आहेत.

  • शरीर आणि मन शांत राहील

जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा ते तुमचे मन आणि शरीर त्वरित ताजेतवाने होते. रात्री अंघोळ केल्याने तुमचा मूड फ्रेश होऊन मन आणि शरीर दोन्ही शांत होण्यास मदत होते. तसेच तणाव कमी होण्यास मदत होईल.

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
  • चांगली झोप येईल

याशिवाय ज्या लोकांना झोप येत नाही, ते रात्री अंघोळ करू शकतात, यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण आंघोळ केल्याने तुमचा तणाव दूर होतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • थकवा देखील निघून जाईल

यासोबतच जर तुम्ही खूप थकले असाल तर रात्री झोपण्यापूर्वी नक्कीच आंघोळ करा. यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला हलके वाटेल.

  • बीपी वाढणार नाही

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी जास्त असतात त्यांनी रात्री अंघोळ करावी. कारण आंघोळ केल्यावर तुम्हाला आराम वाटतो. अशावेळी तुमचे बीपी नॉर्मल होईल.

Heart Attack: चेहऱ्याच्या ‘या’ भागांमधील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा इशारा

  • डोळ्यांसाठी फायदेशीर

रात्री आंघोळ करणे डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. खरे तर रात्री अंघोळ करताना डोळ्यात पाणी येते तेव्हा डोळ्यांना ताजेतवाने वाटते.

  • वजनही कमी होईल

तुम्हाला माहित आहे का की रात्री अंघोळ केल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. एवढेच नाही तर मायग्रेन, अंगदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी कमी होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)