Uric acid : युरिक अॅसिड हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो प्युरिनयुक्त पदार्थांमुळे शरीरात जमा होतो. मोठ्या संख्येने पुरुष आणि महिलांना युरिक अॅसिडचा त्रास होत आहे. युरिक अॅसिडच्या या वाढत्या पातळीमुळे किडनीच्या समस्या, सांधेदुखी व संधिवात यांसारख्या अनेक आरोग्य समस्या उदभवू शकतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकदा औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एका पान खायला सांगत आहोत, जे तुम्हाला युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
युरिक अॅसिड म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, आपण दिवसभर जे काही अन्न खातो, त्यात असलेले प्युरिन नावाचे रसायन युरिक अॅसिड बनवते आणि हे युरिक अॅसिड लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. परंतु, जेव्हा आपल्या शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते लघवीद्वारेदेखील योग्य रीत्या बाहेर टाकले जात नाही. शरीरातून युरिक अॅसिड बाहेर न पडल्यामुळे ते रक्तातच राहते. अशा परिस्थितीत रक्तात अडकून राहिलेले युरिक अॅसिड खडे बनवते आणि ते आपल्या सांधे व त्यांच्या सभोवतालच्या ऊतींमध्ये जमा होतात. त्यामुळे हायपरयुरिसेमिया होऊ शकतो. जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये युरिक अॅसिडची समस्या जास्त प्रमाणात असू शकते.
युरिक अॅसिडचा परिणाम
यूरिक अॅसिडचे उच्च प्रमाण शरीरात विषाक्त घटकांचा संचय वाढवते, ज्यामुळे सांधेदुखी, सूज, मूत्रपिंडातील खडे, युरिक अॅसिड संसर्ग आणि गाऊटचा धोका वाढतो. त्याशिवाय युरिक अॅसिडचे उच्च प्रमाण मधुमेहाचा धोका वाढवू शकते .
युरिक अॅसिडचे प्रमाण कसे कमी करावे?
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल केले पाहिजेत, विशेषतः काही पदार्थ टाळले पाहिजेत. जास्त प्रथिनयुक्त आहारामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढते. म्हणून प्युरिनयुक्त पदार्थ खाणे टाळा.
फक्त आठवड्यातून एकदा ‘हे’ पान खा
त्याव्यतिरिक्त तुम्ही युरिक अॅसिडपासून मुक्त होण्यासाठी सुपारीचे पान खाऊ शकता. सुपारीच्या पानांमुळे युरिक अॅसिडची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने युरिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. ते प्युरिन तयार होण्यासही प्रतिबंध करते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करते.
