scorecardresearch

तुम्हालाही मोज्यांशिवाय बूट वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या याचा पायांवर काय परिणाम होतो

मोज्यांशिवाय बूट घातल्याने पायांसाठी ठरू शकते नुकसानकारक; लगेच जाणून घ्या

तुम्हालाही मोज्यांशिवाय बूट वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या याचा पायांवर काय परिणाम होतो
मोज्यांशिवाय बूट घालण्याचे दुष्परिणाम (Photo: Freepik)

दररोज कॉलेज, ऑफिसला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला, विशेष प्रसंग असल्यास असे रोज किंवा कधीतरी बूट घालायला सर्वांनाच आवडतात. त्यातही बुटांचे वेगवेगळे प्रकार असतात. ऑफिसला जाताना रोज वापरायचे वेगळे, कार्यक्रमासाठीचे वेगळे, व्यायामासाठी वेगळे असे प्रकार असतात, प्रसंगानुसार बुटांची निवड केली जाते. पण अनेकांना बूटाबरोबर मोजे वापरायला आवडत नाहीत. मोज्यांशिवाय बूट वापरतात, पण हे पायांसाठी नुकसानकारक ठरू शकते. मोज्यांशिवाय बूट वापरण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

मोज्यांशिवाय बूट वापरण्याचे दुष्परिणाम:

रक्ताभिसरणावर होतो परिणाम
मोजे न घालता बूट वापरल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. मोजे न घातल्याने पायांवर बुटांचा अधिक ताण पडतो. ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही.

अ‍ॅलर्जी होऊ शकते
काहीजणांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते. चमड्याचे बनलेले मटेरियल चे बूट मोज्यांशिवाय वापरल्याने याची अ‍ॅलर्जी होऊ शकते. तसेच यामुळे पायांना खूप घाम येऊ शकतो.

फंगल इन्फेक्शन
बुटांबरोबर मोजे न वापरल्याने पायांना खूप घाम येऊ शकतो. यामुळे पायांना फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

पायावर फोड येणे
मोजे न वापरल्याने पायांवर बुटांच्या होणाऱ्या घर्षणाने फोड येऊ शकतात, ज्यामुळे चालण्यासही अडचण येते. त्यामुळे हे टाळण्यासाठी बुटांबरोबर नेहमी मोजे घालण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 10:25 IST

संबंधित बातम्या