नवी दिल्ली : निद्राविकारामुळे शांत झोपेचे प्रमाण घटते व त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. भारतात या विकारांचे प्रमाण लक्षणीय आहे. निद्रानाश, खंडित निद्रा (स्लीप एप्निया), पायांची अस्वस्थ हालचाल (रेस्टलेस लेग सिंड्रोम), अतिनिद्रा किंवा अवेळी निद्रा, सतत डोळय़ांवर झोप असणे यांचा यामध्ये अंतर्भाव होतो.

निद्रानाशामागे बहुतांश वेळा चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव व झोपण्याच्या चुकीच्या सवयी, जुनाट आजार व काही औषधेही कारणीभूत असतात. पुरेशा झोपेअभावी प्रचंड थकवा येतो. आकलनक्षमतेवर परिणाम होतो. स्मरणशक्ती मंदावते. कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. चांगल्या निद्रेसाठी इतर सर्व उपायांच्या तुलनेत योगासने आणि ध्यानाचा दीर्घकालीन लाभ होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

झोप घेण्याआधी योगासने केल्यास चांगली निद्रा येते. त्यामुळे मन:शांती लाभते. सर्व चिंता दूर होण्यास मदत होते. ध्यानधारणेमुळेही मनावरील ताणतणाव दूर होतो व शांत झोपेस मदत होते.

विपरीत करणी आसन, सुप्त बद्ध कोनासन, बालासन, शवासन, योगनिद्रा अशी आसने तज्ज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली शिकून झोपेआधी नियमित करावीत.  झोपेआधी हे उपाय केल्यास निद्राविकाराचे मूळ कारणच दूर होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार योगासने करणाऱ्या ५५ टक्के व्यक्तींची झोप सुधारली. ८५ टक्क्यांपेक्षाही अधिक व्यक्तींना त्यांचा तणाव कमी झाल्याचे जाणवले. वेगवेगळय़ा व्यक्तिसमूहांवर योगासनांचा झोप सुधारण्याबाबत सकारात्मक परिणाम होतो, याबाबत अनेक अभ्यासांचे निष्कर्ष आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.