Dry Coconut Health Benefits: नारळाला श्रीफळ असे म्हणतात. कारण काय तर हे एक फळ आहे आहे ज्याच्या शेंडीपासून ते पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा कशासाठी ना कशासाठी वापर होतोच. ताजे- कोवळे शहाळे हे त्याच्या गोड पाण्यासाठी ओळखले जाते, यातला मऊ खोबऱ्याचा गर व मलाई सुद्धा अत्यंत चविष्ट लागते. जसजसा नारळ जुना होऊ लागतो तसे पाणी कमी होऊन खोबरे कडक होऊ लागते, या ओल्या खोबऱ्याचा सुद्धा आपल्याकडे जेवणात वापर केला जातो. हे खोबरं खराब होऊ नये म्हणून नारळाच्या वाट्या उन्हात सुकवल्या जातात व नंतर त्याचा वापर जेवणात होतो. या सुक्या खोबऱ्याचा गंध व चव थोडी खरपूस असल्याने विशेषतः मांसाहारात त्याचा वापर होतो. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा स्निग्ध पदार्थाच्या सेवनाचा सल्ला दिला जात असताना सुके खोबरे हा तुम्हाला आवश्यक पोषण पुरवण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो. याच सुक्या खोबऱ्यात नेमके कोणते जादुई गुणधर्म दडले आहेत हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी संवाद साधताना सुक्या खोबऱ्याचे पोषण प्रोफाइल उलगडून सांगितले आहे. तसेच मधुमेह असल्यास, किंवा गर्भारपणात सुक्या खोबऱ्याचे सेवन करावे की नाही याविषयी सुद्धा सिंघवाल यांनी माहिती दिली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार

सिंघवाल यांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्यात किती पोषक घटक असतात, पाहूया..

  • कॅलरीज: अंदाजे 354 kcal
  • कार्ब्स : 24 ग्रॅम
  • फायबर: 9 ग्रॅम
  • साखर: 6.2 ग्रॅम
  • प्रथिने: 3.3 ग्रॅम
  • फॅट्स : 33.5 ग्रॅम
  • जीवनसत्त्वे: बी 6, नियासिन, राइबोफ्लेविन आणि फोलेटसह बी जीवनसत्त्वे सुक्या खोबऱ्यामध्ये काही प्रमाणात असतात.
  • खनिजे: लोह, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारख्या खनिजांनी समृद्ध

सुक्या खोबऱ्याचे फायदे काय?

  • हृदयाचे आरोग्य: सुक्या नारळात लॉरिक ऍसिड असते, जे चांगले एचडीएल कोलेस्टेरॉल वाढवून हृदयाच्या आरोग्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
  • वजन व्यवस्थापन: कॅलरीज जास्त असूनही, सुक्या खोबऱ्यातील फायबर पोट भरल्याची भावना निर्माण करू शकते, त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते व वजन व्यवस्थापनास मदत होते.
  • पाचक आरोग्य: सुक्या खोबऱ्यातील फायबर निरोगी पचनास समर्थन देते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते.
  • उर्जा स्त्रोत: खोबऱ्यातील मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्स (MCTs) शरीरासाठी ऊर्जेचा जलद स्रोत असू शकतात.
  • जीवनसत्व व पोषक घटकांचा पुरवठा: मॅंगनीज आणि तांबे यांसारख्या खनिजांनी समृद्ध असलेले सुके खोबरे, हाडांच्या आरोग्यासाठी आणि एंजाइमच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मधुमेहींसाठी सुक्या खोबऱ्याचे सेवन योग्य आहे का?

जोपर्यंत खोबऱ्यातील साखर रक्तात मिसळत नाही तोपर्यंत सुके खोबरे मधुमेहींसाठी चांगले असतात. साधारणपणे, २८-३० ग्रॅम सुके खोबरे ताज्या नारळाच्या 2 इंच चौरसाइतके असते. सिंघवाल यांनी सुचवल्याप्रमाणे, मधुमेह असलेल्यांनी रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ टाळण्यासाठी किती प्रमाणात सुके खोबरे खायचे यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

हे गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का?

सुक्या नारळात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात, जी गर्भवतींसाठी समस्या असू शकते. याव्यतिरिक्त, त्यातील पोटॅशियम आणि खनिज घटक बाळाच्या वाढीस मदत करतात.

दरम्यान, सिंघवाल यांनी सुक्या खोबऱ्याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासही सुचवले आहे. जसे की सुक्या खोबऱ्यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असते त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन न केल्यास वजन वाढीचा धोका उद्भवतो. खोबऱ्यातील सॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्ट्रॉलच्या वाढीचे कारण ठरू शकतात. शिवाय जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याची ऍलर्जी असेल तर मात्र आपण सेवन टाळायलाच हवे.

हे ही वाचा<< ‘झिम्मा २’ मधील लाडक्या पात्राला पार्किनसन्स होताच.. पण ‘हा’ आजार नेमका आहे काय? उपचार, लक्षणे व परिणाम वाचा

सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या काही पोस्ट्समध्ये अनेकदा असा दावा केला जातो की सुके खोबरे हे सर्व आजारांवर उपचार ठरू शकते, नारळाचे तेल सुद्धा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. यामध्ये काही प्रमाणात तथ्य असले तरी हा पर्याय एकमेव व सर्वच आजारांवर प्रभावी उपाय नाही हे ही सत्य आहे.