Premium

तुम्हाला मध्यरात्री भुक लागते का? मग, पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पाच हेल्दी पदार्थ खा

जर तुम्हाला अनेकदा रात्री भूक लागत असेल तर ते तुम्ही दिवसा पुरेसे खात नसल्यामुळे असे होऊ शकते.

Nutritionist Approved Healthy Snacks To Beat Midnight Cravings
पाच हेल्दी स्नॅक्सबाबत जाणून घेऊ या जी तुमची मध्यरात्रीची भुक कमी करु शकते ( photo- Freepik/ pixabay)

Weight Loss Tips: तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का? तुम्ही दिवसभराचे काम आटोपून रात्री झोपायला जाता आणि तुम्हाला अचानक काही तरी खाण्याची इच्छा होते. आपल्यापैकी बहुतेक जणांनी हे अनुभवले असावे. मध्यरात्री भूक लागणे ही सामान्य गोष्ट आहे आणि तुम्ही रात्रीचे जेवण केल्यानंतरही तुम्हाला मध्यरात्री भूक लागू शकते. जेव्हा रात्री पोट रिकामे वाटते तेव्हा आपण सहसा आपली भूक भागवू शकेल, असे काहीही खातो जसे की बिस्किटे, नमकीन, चॉकलेटचे किंवा आइसक्रीम. पण हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. मध्यरात्रीच्या भुकेचा सामना करण्याचा हे एकमेव पर्याय नाही. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी काही हेल्दी स्नॅक्सबाबत माहिती दिली आहे; जे तुम्ही मध्यरात्री सेवन करू शकता. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण तुम्ही मध्यरात्री काय खाऊ शकता यावर चर्चा करण्यापूर्वी, भुकेमुळे तुमची झोप का मोडते, ते आधी जाणून घेऊ या. पोषणतज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा काही तरी खाण्याची इच्छा अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये रक्तातील साखरेची असंतुलित पातळी, अनियमित जेवणपद्धती आणि नाईट इटिंग सिंड्रोम (NES) (हा खाण्याचा विकार आहे. यामुळे लोकांना रात्री अनेक वेळा जाग येते आणि खावे लागते मगच पुन्हा झोप येते) यांचा समावेश होतो.

हेही वाचा – ह्रदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल

ती पुढे सांगते की,” जर तुम्हाला रात्री भूक लागली असेल तर तुम्ही दिवसा पुरेसे खात नसल्यामुळे असे होऊ शकते. रात्रीच्या वेळी भूक वाढवणारे इतर घटक म्हणजे ताण.”

रात्री अयोग्य पदार्थ खाण्याबाबत पोषणतज्ज्ञ सांगतात, अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर तुम्हाला सकाळी पोट फुगल्यासारखे वाटू शकते आणि तुमची चिडचिड होऊ शकते. म्हणून, जर तुम्हाला खरोखर काही खायचे असेल तर हेल्दी काही तरी निवडणे चांगले आहे.

हेही वाचा – Diet tips : तुमच्या यकृताची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

आता, पाच हेल्दी स्नॅक्सबाबत जाणून घेऊ या. जी तुमची मध्यरात्रीची भूक कमी करू शकते.

  • वाफवलेल्या भाजीच्या काड्यांसह हुमस किंवा हुमस टोस्ट
    (हुमस म्हणजे चणे आणि तीळ, ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि लसूण यापासून बनवलेली जाड पेस्ट)
  • काही काजू किंवा सुका मेवा
  • मखाना
  • १०० मिली दूध
  • राजगिरा लाडू

पोषणतज्ज्ञ सुचवतात की, तुम्ही हे पदार्थ तुमच्याकडे साठवून ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांचा आस्वाद घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 nutritionist approved healthy snacks to beat midnight cravings snk

First published on: 11-05-2023 at 17:02 IST
Next Story
मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावे की नाही? जाणून डॉक्टर काय सांगतात