AC Side Effects: बदललेल्या वातावरणावरुन उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येते. आपल्या देशाच्या भौगोलिक रचनेमुळे देशातील बऱ्याच ठिकाणी कडक उन्हाळा असतो. त्यामुळे वेगवेगळे उपाय करुन लोक उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय घरांमध्ये पंखा, कूलर अशा उपकरणांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये एसी वापरकर्त्यांचे प्रमाण देखील वाढल्याचे लक्षात येते. काहीजण फक्त उन्हाळ्यामध्ये एसी वापरतात. तर काहींना दररोज एसी लागतो. सतत एसीमध्ये राहणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग एअर कंडीशनरच्या सततच्या उपयोगामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेऊयात…

डिहायड्रेशन (Dehydration)

दिवसभरामध्ये ठराविक लीटर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. पाण्याच्या सेवनामुळे अनेक आजार शरीरापासून लांब राहतात. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत जाते. घामावाटे किंवा अन्य मार्गांनी शरीरातून पाणी बाहेर पडल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. एसी सुरु असलेल्या खोलीमध्ये तासनतास बसल्याने तेथील आर्द्रता कमी होते. परिणामी डिहायड्रेशनचा त्रास संभवतो.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

अस्थमा (Asthma)

जर तुम्हाला अस्थमा असेल, तर एसी असलेल्या खोलीमध्ये बसणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. एसीची मशीन स्वच्छ नसल्यास अस्थमा पिडित रुग्णांना त्रास होतो अशी माहिती समोर आली आहे. सतत एसीचा वापर करत असलेल्या व्यक्तीच्या नाकामधील नेसल पॅसेज कोरडा झाल्याने इंफेक्शन होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा- खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाहीये? दररोज करा ‘या’ प्रमाणामध्ये Apple Cider Vinegar चे सेवन

डोकेदुखी (Headache)

दिवसभर एसीचा वापर केल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. एसी सुरु असलेली खोलीमधील वातावरण आणि बाहेरचे वातावरण यामध्ये फरक असतो. अशात खूप वेळ एसीमध्ये बसून मग बाहेर गेल्यावर डोकं दुखायला सुरुवात होते. मायग्रेन असलेल्या रुग्णांना याचा जास्त त्रास होतो.

त्वचा कोरडी होणे (Dry skin)

एसीचा प्रभाव आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांवर होत असतो. त्यांच्या अति-उपयोगामुळे त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. एसीमुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. यामुळे मानवी त्वचा कोरडी होण्याचा धोका संभवतो. काही वेळेस केस आणि डोळे यांच्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा- Hormonal imbalance मुळे होऊ शकतात गंभीर आजार, हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मेंदूवर परिणाम होणे

एसीमुळे खोलीमधील वातावरण थंड राहते. त्या खोलीमध्ये जास्त बसल्यास मेंदूमधील पेशी संकुचित होण्याची शक्यता असते. असे झाल्यास मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कधी-कधी चक्कर देखील येऊ शकते.

या गोष्टी घडू नयेत असे वाटत असल्यास एसी या विद्युत उपकरणाचा गरज असेल तेव्हाच वापर करावा.