Actor Dipika Kakar reveals she has stage 2 liver cancer: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. आता दीपिकाला कॅन्सरचे निदान झाले आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करीत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. दीपिकाला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. तिच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्टद्वारे ती स्टेज २ लिव्हर कॅन्सरशी झुंजत असल्याचे उघड केले आहे. जेव्हा तिला तीव्र पोटदुखी होत होती आणि डॉक्टरांना तिच्या यकृतात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळला तेव्हापासून ती आणि तिचा अभिनेता पती शोएब इब्राहिम हे तिच्या निदानाबाबतची माहिती देत आहेत, जे नंतर कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑन्कोलॉजी संचालक डॉ. सचिन त्रिवेदी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

यकृताच्या कर्करोगामधील दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन सेंमीपेक्षा मोठा आणि रक्तवाहिन्यांमध्ये घुसलेला एकच ट्यूमर किंवा पाच सेंमीपेक्षा कमी आकाराचे अनेक ट्यूमर आढळतात. या टप्प्यावर कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला नसतो.

यकृताच्या कर्करोगाचा दुसरा टप्पा किती गंभीर?

यकृताच्या कर्करोगाचा दुसरा टप्पा म्हणजे कर्करोगाची काहीशी सुरुवात; पण शरीरात तो दूरपर्यंत पसरलेला नाही. तसेच, तो शस्त्रक्रियेने बरा होण्याची शक्यता जास्त आहे”, असे मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑन्कोलॉजी संचालक डॉ. सचिन त्रिवेदी यांनी स्पष्ट केले. ते असेही म्हणतात की, भविष्यात पुन्हा कर्करोग होण्याचा किंवा पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी की- शस्त्रक्रियेनंतरचा उपचारक्रम खूप महत्त्वाचा आहे. “शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला डीएनए तपासण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकलेल्या कर्करोगाच्या ऊतींची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्करोगाची नेमकी स्थिती, उपचारांना कितपत प्रतिसाद मिळण्याची शक्यता आणि संभाव्य पुनरावृत्तीची जोखीम यांबद्दलची स्पष्टता मिळते. त्यानुसार डॉक्टर लक्ष्यित उपचार, इम्युनोथेरपी, केमोथेरपी व रेडिओथेरपीसह बहु-मॉडेल दृष्टिकोन उपचारांचा निर्णय घेऊ शकतात. नवीन रक्त चाचण्या आपल्याला सांगतात की, कर्करोग रक्तप्रवाहात पसरू शकतो का; जेणेकरून आपण त्याला संपवू शकतो.

तरुणींमध्ये यकृताचा कर्करोग होण्याची कारणे कोणती?

पुण्यातील रुबी हॉल येथील मेडिकल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. मिनिश जैन म्हणतात की, आज तरुणींमध्ये यकृताचे ट्यूमर पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तरुणांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होण्याची वाढती संख्या. हे बहुतेकदा लठ्ठपणा, चुकीचा आहार व बैठी जीवनशैलीशी जोडलेले असते.

अधिक प्रगत अवस्थेत ट्यूमर आढळण्याचे आणखी एक कारण म्हणजे यकृताशी संबंधित लक्षणे- जसे की थकवा, पोटात अस्वस्थता किंवा वजनातील बदल.

यकृताच्या कर्करोगाशी हार्मोनल घटकदेखील जोडले गेले आहेत. “गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर यकृताच्या सौम्य ट्यूमरशी जोडला गेला आहे, ज्याला यकृताचे एडेनोमा म्हणतात, जे कधी कधी मोठे होऊ शकतात किंवा कर्करोगातही बदलू शकतात. यकृत रोग, जो महिलांमध्ये अधिक सामान्य आहे. कालांतराने यकृताची जळजळ आणि नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये तरुणींना आयुष्यात सुरुवातीला नकळत हेपॅटायटिस बी किंवा सीची लागण झाली असेल, तर हे विषाणू वर्षानुवर्षे शरीरात राहू शकतात. मग हळूहळू हे विषाणू यकृताचे नुकसान करतात आणि प्रौढावस्थेत कर्करोगास कारणीभूत ठरतात” असे डॉ. जैन म्हणतात.

हेपॅटायटिस म्हणजे काय ?

हेपॅटायटिस हा यकृताचा एक दाह असून, तो हेपॅटायटिस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते आणि शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हेपॅटायटिस ए, बी, सी, डी व ई यांसह अनेक प्रकारचे विषाणू हेपॅटायटिसला कारणीभूत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकरणांवरून असे दिसून येते की, आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या यकृताच्या स्थितीचे मूल्यांकन करणे, ते फॅटी आहे का ते शोधणे आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करणे गरजेचे आहे. “जर तुम्हाला कौटुंबिक इतिहास, मधुमेह व लठ्ठपणा यांसारखे जोखमीचे घटक माहीत असतील, हेपॅटायटिस बी व सी झाला असेल, तुम्ही धूम्रपान करणारे किंवा मद्यपान करणारे असाल, तर दर सहा ते १२ महिन्यांनी यकृताच्या कार्याची चाचणी करा” असा सल्ला डॉ. त्रिवेदी यांनी दिला आहे.