प्राचीन काळापासून तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने ती तुमच्या जेवणाची चव वाढवतेच, पण आरोग्यासाठी भरपूर फायदेही मिळतात. गेल्या अनेक शतकांपासून पारंपरिक भारतीय औषधांमध्येही शुद्धतेचे प्रतीक आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये मुख्य घटक म्हणून तूप किंवा कच्चं लोणी वापरले जाते. तूप खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, त्यामुळे वडीलधारी माणसं आणि डॉक्टर आहारात तुपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
अभिनेत्री-टीव्ही होस्ट मलायका अरोरा हिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “ती तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा तुपाने करते. खरं तर अनेक सेलिब्रिटींनी सकाळी उठल्यानंतर कॉफीमध्ये तूप मिसळून दिवसाची सुरुवात करण्याबद्दल सांगितले आहे. तूपामध्ये संतृप्त चरबी(Saturated Fat/ Unhealthy Fats) असते पण तरीही बहुतेक पोषणतज्ज्ञ आणि डॉक्टर मर्यादित प्रमाणात तूप सेवनाचा सल्ला देतात कारण तूप हे अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे आणि त्याच्या सेवनामुळे पचन आणि चयापचय (Digestion and Metabolism)दोन्ही सुधारते. चांगले पचन आणि चयापचय हे आतड्यांच्या चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
“एक चमचा तूप पाचक एंजाइम आणि गॅस्ट्रिक अॅसिडच्या स्रावाला उत्तेजन देण्यास मदत करू शकते, जे पोषक तत्त्वांचे जलद शोषण करण्यास मदत करते. तुपात ब्युटीरिक अॅसिड असते, जे मल(शौच/stool) मऊ करू शकते आणि नियमित आतड्यांच्या हालचालींना मदत करते. ते दाहकता कमी करते, त्यामुळे आतड्यांचे अस्तर आणि आतड्यांचे सूक्ष्म जीवदेखील निरोगी ठेवते. चरबीचा स्रोत म्हणून ते दिवसभर सतत ऊर्जा प्रदान करू शकते,” असे दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील सल्लागार आहारतज्ज्ञ मुक्ता वशिष्ठ यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
तुपाची पौष्टिक रचना काय आहे? (What’s the nutritional profile of ghee?)
तूप हे एक प्रक्रिया न केलेल्या लोण्यापासून तयार होते. हळूहळू लोणी कडवून त्यातील पाणी आणि दुधाचे घन पदार्थ काढून टाकते आणि शुद्ध सोनेरी फॅट्स मागे सोडते. यामुळे ते आवश्यक फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध होते, जे फॅटस्-विरघळणारे जीवनसत्त्वे (ए, डी, ई आणि के) आणि अँटीऑक्सिडंट्स शोषून घेतात आणि पेशींमध्ये जलद वाहून नेतात. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड ओमेगा-३ चे प्रमाण असते. थोड्या प्रमाणात तूप पाचक एंझाइम्स (Digestive enzymes) आणि पित्त उत्पादनास समर्थन देऊ शकते, ज्यामुळे आम्लता (Acidity) आणि पित्ताची गुळणी (Reflux) येणे नियंत्रित करण्यास मदत होते. तुपाच्या सेवनामुळे तृप्तता देखील मिळते, ज्यामुळे सकाळी भूक लागत नाही आणि साखरेची पातळी कमी होण्याचा त्रास होत नाही.
तुपात मध्यम पातळीचे फॅटी अॅसिड असतात, जे फॅट्स म्हणून साठवण्याऐवजी लवकर शोषले जातात आणि ऊर्जेसाठी वापरले जातात. ही प्रक्रिया चयापचय वाढवते, ज्यामुळे विश्रांती घेत असतानाही जास्त कॅलरी बर्न होते. तुपातील फॅट्स शरीराला ऊर्जेचा प्राथमिक स्रोत म्हणून फॅट्स वापरण्यास प्रवृत्त करते, ही स्थिती केटोसिस म्हणून ओळखली जाते. ही स्थिती साठवलेल्या फॅट्सच्या जळण्याशी संबंधित आहे आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी तुपाचे सेवन करण्यास का सांगितले जाते? (What’s the safe limit for daily use?)
तूपात संतृप्त चरबी (saturated fat) आहे परंतु, संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यातील कॉनज्युगेटड लिनोलिक अॅसिड (conjugated linoleic acid/CLA) हानिकारक कोलेस्ट्रॉल किंवा कमी घनता असलेले लिपोप्रोटीन (LDL) कमी करण्यास मदत करू शकते; तर चांगले कोलेस्ट्रॉल किंवा उच्च-घनता असलेले लिपोप्रोटीन (HDL) वाढवते. स्वयंपाक करतानादेखील कमी उष्णता आवश्यक असते.
दररोज तुपाचे सेवन करण्यासाठी सुरक्षित मर्यादा काय आहे? (What’s the safe limit for daily use?)
दिवसातून एक चमचा (५ ग्रॅम) प्रत्येकासाठी सुरक्षित आहे. तुमच्या आहारात ते समाविष्ट केले पाहिजे. दैनंदिन फॅट्सचे सेवन हे दैनंदिन कॅलरीजच्या २० ते ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही सकाळी तूप घेतले असेल, तर दिवसभरात तुम्ही तूप घेणार नाही याची खात्री करा. तुपाचे सेवन वाढवण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अनेक सेलिब्रिटींची तूप घालून कॉफी पिण्याला पसंती असल्याने, कॉफी पिण्याची ही एक नवीन आणि आनंददायी पद्धत वाटू शकते. परंतु, सेलिब्रिटी नियमित शारीरिक व्यायामासह संतुलित आहाराचे पालन करतात, म्हणून आहाराबरोबर झोप आणि व्यायाम या जीवनशैलीच्या इतर गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका.