मुळव्याध किंवा पाईल्स ही गंभीर समस्या आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे व बदलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार होऊ शकतो. आपण सतत बाहेरचे पदार्थ, अधिक मसालेदार, तेलकट व मैद्याचे पदार्थ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू लागते. काहीवेळेस एकाच ठिकाणी बसून राहिल्यास व शरीराची हालचाल न झाल्यासही हा त्रास जाणवू लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. काहीवेळेस याचा त्रास हा सौम्य स्वरुपाचा असल्यामुळे याची लक्षणे आपल्याला जाणवत नाही. यामुळे आपल्याला शौचानंतर रक्तस्त्राव होणे, त्या ठिकाणी खाज लागणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत जीवनशैलीत बदल करण्यासोबतच काही घरगुती उपायांचा वापर केल्यास या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. असाच एक प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मूळव्याधात ओव्याचा वापर. जाणून घेऊया मूळव्याधात ओवा कसा ठरतो प्रभावशाली.

मूळव्याधासाठी ओवा ठरतोय रामबाण

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी घ्या

मूळव्याधासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी घेऊ शकता. ओव्याचे हे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. पण, मूळव्याध रुग्णांसाठी ते खास आहे. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आतड्यांसंबंधी मार्गाची जळजळ कमी करतात आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुधारतात. यामुळे मूळव्याधातील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

(आणखी वाचा : चहाप्रेमींनो, तुम्ही पण थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम )

ओवा आणि हिंग भाजून खा
मूळव्याधच्या समस्येवर भाजलेला ओवा आणि हिंग खाणे खूप प्रभावी ठरते. वास्तविक, ओव्यामध्ये फायबर असते आणि हिंग पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन देते. एकत्रितपणे, दोन्ही पचन गती वाढवतात आणि आतड्याची हालचाल सुलभ करतात. अशाप्रकारे, या दोन्हीच्या नियमित सेवनाने मूळव्याधची लक्षणे दूर होण्यास मदत होते.

ओवा भिजवून खा
जर तुम्हाला मूळव्याधची समस्या असेल तर तुम्ही ओवा भिजवून खावा. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ओवा पाण्यात भिजत ठेवा. मग ते सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे मूळव्याधची लक्षणे दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे जर तुम्ही मूळव्याधच्या समस्येने त्रस्त असाल तर ओव्याचे सेवन करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajwain for piles uses benefits pdb
First published on: 21-11-2022 at 18:25 IST