Akshay Kumar away from samosa for 15 years : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याने आपल्या कारकिर्दीत अॅक्शन, कॉमेडी ते हॉरर-कॉमेडी अशा जवळपास सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘Mr and Mrs Khiladi’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाती ‘जब तक रहेगा समोसे में आलू’ हे गाणं त्या काळात प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामुळे समोशाला एक वेगळीच रोमँटिक ओळख मिळाली. ज्या समोशामुळे या गाण्यामुळे खास लोकप्रियता मिळाली, त्याच समोश्यापासून अक्षय कुमार गेली तब्बल १५ वर्षं दूर आहे आणि त्यामागचं कारण स्वतः अभिनेत्यानेच उघड केल्यामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भारतात समोसा हा केवळ एक नाश्त्याचा पदार्थ नाही, तर लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. सकाळचा गरमागरम चहा असो, ऑफिसमधील ब्रेक असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा असोत… प्रत्येक वेळी गरमागरम समोसे लोकांना भुरळ पाडतात. बटाटे आणि मसाल्यांनी भरलेले समोसे, गोड-तिखट चटणीबरोबर आवडीने खाल्ले जातात. समोशाचे हे वर्णन ऐकून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल असेल तर त्यात काही नवलं नाही. पण तुम्हाला माहित आहे का, की बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने गेल्या १५ वर्षांपासून एकही समोसा खाल्ला नाही. हे ऐकायला अविश्वसनीय वाटतं, पण त्यामागे एक कारण आहे. ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या गेम शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागात, या खिलाडी अभिनेत्याने इतकी वर्षे हा रस्त्यावरील मिळणारे पदार्थ खाणे टाळण्यामागचे कारण उघड केले.

आरोग्यासाठी अक्षयने टाळले समोसा खाणे (Avoided samosa due to health reasons)

“असं कुठे लिहिलंय की,”जो माणूस समोसा खाणार नाही तो चुकीचा आहे. नाही. जर समोसा खाल्ला नाही तर मी काहीही चुकीचं केलं नाही ?”, असं स्पष्टीकरण देत तो म्हणाला की, हा डाएट किंवा वजन वाढण्याचा प्रश्न नाही, तर त्याच्या शरीराची प्रतिक्रिया आहे, ज्यामुळे ॲसिडिटी आणि अस्वस्थता जाणते. त्याने हेही सांगितले की, जेव्हा त्याने “जब तक रहेगा समोसे में आलू” हे प्रसिद्ध दृश्य चित्रित केले, तेव्हा त्याने एकही समोसा खाल्ला नव्हता.”

समोस्यामध्ये साधारणपणे मैद्यापासून बनवलेला कुरकुरीत बाह्य थर आणि उकडलेले बटाटे व भारतीय मसाल्यांचे चविष्ट सारण असते. तेलात तळलेले हे पदार्थ पारंपरिकरित्या चटणी आणि टोमॅटो केचपसह गरमागरम दिले जातात. उत्तर आणि पूर्व भारतातील एक आवडता पदार्थ असलेल्या समोशांनी देशभरात लोकप्रियता मिळवली आहे, ज्यामुळे विविध आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी आणि या आवडत्या पदार्थाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी फ्यूजन प्रकारांना प्रेरणा मिळाली आहे.

अक्षय कुमारप्रमाणे तुम्हीही समोसा खाणे टाळावे का?(Should you too avoid eating Samosa like Kumar?)

याबाबत मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्स, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. परिण संगोई यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना स्पष्ट केले की, जेव्हा समोशासारखे तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या आहाराचा अविभाज्य भाग बनतात, तेव्हा ते तुमच्या रक्तवाहिन्यांवर हळूहळू एकत्रित परिणाम करू लागतात. “प्रत्येक वेळेस समोसा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होणे, दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. कालांतराने, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होतो, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. आज जो पदार्थ निरुपद्रवी वाटतो, तो काही वर्षांनी हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकतो,” असे ते म्हणाले.

ट्रान्स फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका (Trans fats may increase cholesterol levels)

“ट्रान्स फॅट,कर्बोदकांचे जास्त प्रमाण आणि मीठयुक्त पदार्थ रक्तवाहिन्यांच्या भिंती कठीण करतात, रक्तदाब वाढवतात आणि वाईट कोलेस्ट्रॉल व चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण बिघडवतात,” असे डॉ. संगोई म्हणाले.

तळलेले पदार्थ हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात? (Fried foods may be risky for heart health)

याबाबत सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई येथील क्लिनिकल डायटिशियन वेदिका प्रेमानी यांनी दी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना पुढे सांगितले की, “जरी समोसा पदार्थ शरीरासाठी अत्यंत अनारोग्यकारक असला तरी, तो बनवण्याच्या पर्यायी आणि आरोग्यदायी पद्धती उपलब्ध आहेत.” आले, दालचिनी आणि वेलची यांसारख्या उपयुक्त पदार्थांच्या समावेशामुळे पदार्थाची चव तर वाढेलच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि दाहशामक म्हणून काम करणे यांसारखे आरोग्यदायी फायदेही मिळतील. आणि आरोग्यदायी तेलांमध्ये व बेकिंग किंवा एअर फ्रायिंगसारख्या इतर पाककृती पद्धती वापरून बनवल्यास समोशाचा आनंद घेता येईल,” असे त्या म्हणाल्या.

आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करण्याचा सल्ला (Advice to choose healthier alternatives)

“आणि जर तुम्हाला समोसे खाणे पूर्णपणे टाळायचे असतील, तर आरोग्यदायी स्नॅक पर्यायांमध्ये ह्युमसबरोबर भाजलेले नाचणीचे चिप्स, ढोकळा, मखाना, चना चाट आणि घट्ट दह्याच्या डिपसोबत खाकरा यांचा समावेश होतो. एअर-फ्राईड भाज्या देखील नेहमीच्या समोशांपेक्षा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतात,” असे प्रेमानी यांनी स्पष्ट केले.