Akshay Kumar’s 6:30 PM Eating Rule : अभिनेता अक्षय कुमार जितका अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. बुत बंगला फेम अभिनेता अक्षय कुमारने नुकतेच आरोग्यासाठी फायदेशीर टिप्स चाहत्यांसाठी सांगितली. त्याने त्याच्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून, इंडिया’ या गेम शोमध्ये सांगितले की, “चांगले आयुष्य जगण्याचा सर्वात चांगला एकच फॉर्म्युला आहे. मला अनेक लोक विचारतात की, कोणता व्यायाम केला पाहिजे मी नेहमी सांगतो एकच व्यायाम करा जो सायंकाळी ६.३० नंतर करू नये तो म्हणजे तोंड बंद करा म्हणजेच सायंकाळी ६.३० नंतर काहीही खाऊ नका. आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की, सुर्यास्तानंतर घरातील चूल बंद करा कारण सायंकाळनंतर आपल्या पोटातील अग्नी(पचनसंस्था) शांत होतो म्हणजेच पचनक्रिया मंदावते.” मात्र, सूर्यास्तानंतर जेवण पूर्णपणे टाळणे हा नियम प्रत्येकासाठी योग्य आहे का? यावर तज्ज्ञांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

अक्षय कुमारच्या ६.३० नंतर काहीही न खाण्याचा नियमाबाबत द इंडियन एक्सप्रेसने तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. याबाबत ठाण्यातील केआयएमएस हॉस्पिटल, मुख्य आहारतज्ज्ञ, अमरिन शेख सांगतात की, या ६.३० नंतर जेवण न घेण्याच्या सल्ल्यामध्ये काही तथ्य आहे, पण त्यासाठी संदर्भाची गरज आहे. आपले शरीर नैसर्गिक चक्रानुसार काम करते त्यामुळे आपली पचनसंस्था दिवसभरात चांगल्या प्रकारे काम करते. उशीरा जेवण करणे विशेषत: पचण्यास जड आणि तेलकट आहार घेतल्यामुळे अपचन होऊ शकते, शांत झोप लागत नाही आणि कालांतराने वजन वाढते. पण सायंकाळी ६:३० ची कठोर वेळ निश्चित करणे प्रत्येकासाठी व्यावहारिक किंवा आवश्यक नाही.”

शेख यांनी स्पष्ट केले की, आपले शरीर सुर्यास्तनंतर कार्य करणे बंद करत नाही.पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शेवटचे जेवण पचण्यास किती जड होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आदर्शपणे, तुमच्या रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये २-३ तासांचे अतंर असणे आवश्यक आहे. जर कोणी १० वाजता झोपत असेल तर ७-३० वाजेपर्यंत जेवण करावे. मात्र जे उशिरा जेवतात त्यांनी झोपेच्या वेळेनुसार रात्रीच्या जेवणाची वेळ ठरवावी.

जेवण लवकर करण्याचे काही दुष्परिणाम आहे का?(Is there a downside to eating dinner too early?)

होय, जर तुमचे रात्रीचे जेवण खूप लवकर झाले तर झोपेच्या वेळ आणि जेवणाच्या वेळेतील अंतर वाढते आणि लोक रात्री विनाकारण स्नॅक्स खातात. यामुळे अनेकदा जास्त कॅलरी असलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले जातात, ज्यामुळे रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदे कमी होतात, असे शेख यांनी निदर्शनास आणून दिले.

शहरी जीवनशैलीसाठी कोणता संतुलित दृष्टिकोन योग्य ठरेल?(What would be a balanced approach for urban lifestyles?)

जेवणाची वेळ काटेकोरपणे पाळण्याऐवजी, रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असेल याचा प्रयत्न करा. त्यात डाळ, भाज्या आणि माफक प्रमाणात कर्बोदकांचा समावेश करा. रात्री उशिरा तळलेले जड पदार्थ किंवा गोड मिष्टान्न खाणे टाळा. सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे; कठोर नियमांपेक्षा जेवणाच्या नियमित वेळांना तुमचे शरीर अधिक चांगला प्रतिसाद देते.

लवकर जेवल्याने पचन आणि झोपेसाठी मदत होऊ शकते, पण वैयक्तिक आवडीनिवडी महत्त्वाच्या आहेत. आपल्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या, जेवणाची वेळ आपल्या दिनक्रमानुसार जुळवा आणि केवळ वेळेवरच नव्हे, तर तुम्ही काय आणि किती खाता यावर लक्ष केंद्रित करा.