scorecardresearch

Blood Test : ‘या’ ५ रक्ताच्या चाचण्यांमुळे होतो हार्ट अटॅक, कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांचे निदान

कोणत्याही आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून अनेकदा रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

Blood Test
Blood Test : 'या' ५ रक्ताच्या चाचण्यांमुळे होतो हार्ड अटॅक, कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांचे निदान ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रक्त हा आपल्या शरीरातील एक अविभाज्य घटक आहे. शरीरातून जर रक्त काढून टाकले तर आपण एक मिनिटही जिवंत राहू शकत नाही. कारण शरीरातील प्रत्येक अवयव हा रक्ताशी जोडलेला आहे. रक्त फुफ्फुसातून ऑक्सिजन घेत ते शरीराच्या प्रत्येत भागात वाहून नेते. ऑक्सिजन व्यतिरिक्त शरीरातील प्रत्येक अवयवांना पोषक तत्व पोहचवण्याचे काम रक्ताच्या माध्यमातून होते. शरीरातील चांगले वाईट बदल हे रक्तातून ओळखता येतात. त्यामुळे आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडून अनेकदा रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

रक्त तपासणीमुळे कॅन्सर, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, एचआयव्ही, डायबिटीससोबत अनेक आजार वेळीच ओळखता येतात. म्हणून डॉक्टरांकडून वर्षातून किमान एकदातरी रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे कोणत्याही आजाराचे निदान लवकर करता येते.

सीबीएस चाचणी (CBS)

सीबीएस रक्ताच्या चाचणीमध्ये १० पेक्षा अधिक रोगांचे निदान करता येते. यात एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य स्थितीचे मूल्यांकन केले जाते ज्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स, हेमॅटोक्रिट, हिमोग्लोबिनसह अनेक गोष्टींची माहिती मिळते. जर यात काही गडबड झाली तर व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दिसून येते. या चाचणीद्वारे अॅनिमिया, ब्लड कॅन्सर, अनेक प्रकारचे इन्फेक्शनचे निदान करता येते. सीबीसीला अनेकदा रक्त हिमोग्राम किंवा सीबीसी विथ डिफरेंशियल असेही म्हणतात.

बेसिक मेटाबॅलिक पॅनेल (BMP)

बेसिक मेटाबॅकिल पॅनेल चाचणीत डॉक्टरांच्या निर्देशानुसार, रक्त काढण्यापूर्वी किमान ८ तास उपाशी रहावे लागते. किडनी संबंधीत आजारांमध्ये डॉक्टरांकडून या चाचणीची शिफारस केली जाते. या शरीरातील कॅल्शियम, ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट, क्लोराईड, युरिया नायट्रोजन आणि क्रिएटिनिन या आठ पदार्थांमधील रक्ताचे प्रमाण मोजते जाते. मधुमेह, किडनीचे आजार आणि हार्मोन्सचे असंतुलनही यातून शोधले जाते.

कप्रेसिव्ह मेटाबॅलिक पॅनल (CMP)

जरी बेसिक मेटाबॅलिक पॅनेल आणि कप्रेसिव्ह मेटाबॅलिक पॅनल चाचणीत थोड्याफार प्रमाणात साम्य आहे. पण या चाचणीत शरीरातील काही अतिरिक्त प्रथिने जसे की अल्ब्युमिन, अल्कलाइन फॉस्फेटस, अॅलानाइन एमिनोट्रान्सफेरेस आणि एस्पार्टेट एमिनोट्रान्सफेरेस बिलीरुबिनची तपासणी केली जाते. यकृतासंबंधीत आजारांमध्ये डॉक्टरांकडून ही ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

लिपिड पॅनल

लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण तपासले जाते. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडे प्रमाण जास्त असल्यास आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. यामुळे विविध ह्रदयविकार, पक्षाघात यासारखे गंभीर आजार निर्माण होतात. या चाचणीसाठीही किमान ८ तास उपाशी राहावे लागते.

थायरॉईड पॅनेल

थायरॉइड ही शरीरातील एक महत्वाची ग्रंथी आहे, गळ्यात असलेल्या या ग्रंथीतून T3, T4 या हार्मोन्सची निर्मिती होते. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हार्मोन्सची गरज असते. त्यामुळे थायरॉइड फंक्शन टेस्टच्या माध्यमातून रक्तातील T3, T4, TSH ची तपासणी केली जाते. या थायरॉईड पॅनेल टेस्टला थायरॉईड फंक्शन टेस्ट म्हणूनही ओळखले जाते. या टेस्टमुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालू आहे की नाही ते तपासले जाते.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 16:12 IST