Almond Side Effects: बदामाचे शरीरासाठीचे फायदे आपण सर्वच जाणतो. आपल्या शरीराला बदामाचे पोषण मिळावे म्हणून आईच्या पोटात असल्यापासूनच प्रयत्न सुरु असतात. गर्भावस्थेत महिलांना बदामाचे सेवन आवर्जून करण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. इतरही वेळेस आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास, हृदयाच्या स्वास्थ्यासाठी बदाम खाणे फायद्याचे मानले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का बदामाचे अधिक सेवन शरीराला फायद्यापेक्षा अधिक नुकसान पोहचवू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही आजारात बदाम हा एखाद्या विषारी घटकाप्रमाणे शरीरात काम करू शकतो. हे आजार कोणते व कोणत्या रुग्णांनी बदामाचे सेवन टाळायला हवे हे आता आपण जाणून घेऊयात…

तुम्हाला बदामाचा कितपत धोका?

१) किडनी स्टोन

प्राप्त माहितीनुसार बदामात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते, हा घटक पचनास कठीण असतो परिणामी बहुतांश वेळेस शरीर त्याचे पचन पूर्ण करत नाही व किडनीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण वाढीस लागते. अशा परिस्थितीत मुतखड्याचा त्रास बळावण्याची शक्यता असत , जर आपल्याला अगोदरच किडनी स्टोनचे निदान झाले असेल तर अशा मंडळींनी तर बदामापासून दोन हात लांबच राहणे हिताचे ठरेल.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

२) त्वचेच्या अॅलर्जी

बदामात अमांडाइन नावाचे प्रोटीन अधिक प्रमाणात असते. हे प्रोटीन काहींच्या शरीराला साजेसे ठरत नाही उलट याचा गंभीर परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येऊ शकतो. त्वचा तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच बदामाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

३) अॅसिडिटी

बदामाचे सेवन हे अपचनाचे कारण ठरू शकते. परिणामी सतत करपट ढेकर, अॅसिडिटी, डायरिया असे त्रास जाणवू शकतात. जर तुम्हाला मळमळ किंवा यापोटी बिघडल्याचे समस्या जाणवत असेल तर बदाम खाणे टाळावे.

४) श्वसन समस्या

बदाम हाइड्रोसायनिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते. जर शरीरात या HCN चे प्रमाण वाढले तर श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बदामाचे सेवन हे प्रमाणात करणे गरजेचे आहे. आता हे योग्य प्रमाण नेमकं किती हे पाहुयात..

हे ही वाचा<< मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डॉ. वी. के. मिश्रा यांच्या माहितीनुसार बदामाच्या सेवनाच्या बाबत नियमित विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बदाम सोलून खायचा की नाही? यावर डॉक्टर मिश्रा यांनी अत्यंत सोपे उत्तर दिले आहे. वैज्ञानिक दृष्टीने बदाम हे साल न काढताच खाणे फायद्याचे ठरू शकते. बदामाच्या सालांमध्ये पॉलिफिनॉल्स नामक एक घटक असतो जो एक अत्यंत उपयुक्त अँटिऑक्सिडंट आहे. बदामाची साल ही फायबरयुक्त असते. वरील त्रास नसणाऱ्या, ठणठणीत स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तीने एका दिवसात ५६ ग्रॅम म्हणजे १० ते १२ बदामाचे सेवन करण्यास हरकत नाही.