Bad Cholesterol Remedies: कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक चिकट पदार्थ आहे जो आपल्या शरीरात वाढल्यास परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा हृदय, मेंदू व अन्य महत्त्वाच्या अवयवांना रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा काई होऊ लागते. वेळीच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात न आणल्यास याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे तुमच्या आहारात बदल घडवणे. आपण दिवसाची सुरुवात चहा, कॉफी, हॉट चॉकलेट किंवा साधं दूध पिऊन करत असाल तर आज आम्ही आपल्या फायद्याची माहिती सांगणार आहोत. वैद्यकीय अभ्यासक व तज्ज्ञांचं माहितीनुसार काही प्रकारच्या दुधाने शरीरातील कोलेस्ट्रॉल अगदी सहज नियंत्रणात येऊ शकते.

दूध हे असे एक पेय आहे ज्यात कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे ए आणि बी12, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त आणि आयोडीन सारखे पोषक तत्व मुबलक असतात. नियमित दुधाव्यतिरिक्त, आपण आज काही वनस्पती-आधारित दुधाचे पर्याय पाहणार आहोत जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

कोलेस्ट्रॉल पातळी सुधारण्यासाठी बेस्ट दूध कोणते? (Milk Reduces Cholesterol)

सोयाबीन दुध (Soy Milk)

सोयामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते त्यामुळेच कोलेस्टेरॉल कमी करण्यात सोया मिल्क अत्यंत उपयुक्त ठरू शकते. शिवाय आपण वजन कमी करू इच्छित असल्यास हे सोया मिल्क अत्यंत उपयुक्त आहे कारण यात फक्त ८० कॅलरीज आणि प्रति कप सर्व्हिंगमध्ये फक्त २ ग्रॅम फॅट आणि उच्च पातळीचे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दररोज २५ ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन हा शरीरात आवश्यक फॅट्स व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका सुमारे ३० टक्क्यांनी कमी करण्यास मदत करतो.

ओट्स दूध (Oats Milk)

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन्स भरपूर असतात ज्यामध्ये जेल सारखा पदार्थ असतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल रक्तात शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की ओट्सचे दूध कोलेस्ट्रॉलमध्ये घट करते. सॉलिड ओट्स, म्हणून हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांनी दररोज किमान २५० मिली ग्लास भरून दूध प्यावे. ओट्सच्या दुधात व्हिटॅमिन बी देखील मुबलक असते, जे अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

बदामाचे दूध (Almond Milk)

बदाम हा एक हृदयाचे आरोग्य सुधारणा सुका मेवा आहे. आरोग्य तज्ज्ञांनी हृदयाच्या रुग्णांसाठी बदामाचे कमी-कॅलरी, डेअरी-मुक्त दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. गोड न केलेल्या बदामाच्या दुधात 1-कप सर्व्हिंगमध्ये ३० -४० कॅलरीज असतात आणि त्यात झिरो सॅच्युरेटेड फॅट असते. बदामाच्या दुधात गाईच्या दुधाइतकेच व्हिटॅमिन डी असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, बदामाच्या दुधामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते जे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

हे ही वाचा<< पोटातून खराब कोलेस्ट्रॉल बाहेर फेकेल ‘हे’ एक फळ; डॉक्टरांनी सांगितलं कसे व किती कराल सेवन?

तांदूळ दूध (Rice Milk)

तांदळाच्या दुधात गायीच्या दुधाइतकेच कॅल्शियम असते. एक कप सर्व्हिंगमध्ये ११३ कॅलरीज असतात. तांदळाच्या दुधात नियासिन आणि व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असते. त्यात इतर सर्व पर्यायांच्या तुलनेत फॅट्सचे प्रमाण कमी असते.

टीप: बाजारात वरील दुधाचे पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही सुरुवातीला काही प्रमाणात हे दूध ट्राय करू शकता. त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. चवीच्या बाबत हे दुधाचे पर्याय फार वेगळे नसतात त्यामुळे तुमच्या नियमित चवीला काहीही त्रास होणार नाही. तुम्हाला सवय लागल्यावर हे दूध घरी सुद्धा बनवून पाहू शकता.