Amazing Benefits of Moringa Leaves: चुकीचा आहार आणि बिघडणारी जीवनशैली हाडांवरही परिणाम करते. लहान वयातच लोकांची हाडे कमकुवत होतात आणि उठता-बसताना हाडांमधून आवाज येतो, तसंच उभे राहणे इतर दैनंदिन कामं करणं कठीण होऊन जातं. कॅल्शियमची कमतरता हा हाडे कमकुवत होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. मजबूत हाडांसाठी पुरेसे कॅल्शियम आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे हळूहळू कमकुवत आणि ठिसूळ होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडेदेखील कमकुवत होऊ लागतात. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करते.
महिलांना साधारण ३० ते ४० वयोगटातल्या, हाडांच्या वेदनांचा धोका जास्त असतो. या वयात महिलांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, त्यामुळे हाडांच्या ताकदीवर परिणाम होतो. जास्त वेळ बसून राहिल्याने आणि व्यायामाचा अभाव असल्याने हाडे कमकुवत होतात. जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रक्रिया केलेले अन्न हाडांना आवश्यक खनिजे कमी करतात.
हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक एका पानात आहेत. हाडांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत प्रभावी ठरते. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हाडे मजबूत करण्यासाठी आणि मज्जतंतूंतील कमकुवतपणा दूर करण्यासाठी मोरिंगाच्या अर्थात शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. ही पाने शरीरातील व्हिटॅमिन बी १२ची कमतरता पूर्ण करतात. मोरिंगाच्या पानांना सुपरफूडदेखील म्हटले जाते. कारण त्यात शरीराला आवश्यक असलेले जवळपास सर्व पोषक घटक असतात. आयुर्वेदात ते शरीराला आतून बळकट करतात असे म्हटले जाते. मोरिंगामध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी देखील असते, ते बी १२चे शोषण सुधारते. म्हणूनच जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुमच्या आहारात मोरिंगा पानांचा समावेश हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
१०० ग्रॅम मोरिंगा पानांमधील पोषक घटक
प्रथिने ९ ग्रॅम
कॅल्शियम ४४० मिलीग्रॅम
लोह ७ मिलीग्रॅम
व्हिटॅमिन सी २२० मिलीग्रॅम
पोटॅशियम २५० मिलीग्रॅम
व्हिटॅमिन ए ६००० मायक्रोग्रॅम
वाळवलेल्या मोरिंगामध्ये व्हिटॅमिन बी १२ ०.५ ते १.२ मायक्रोग्रॅम
शेवग्याचा पाला कसा ठरतो फायदेशीर
शेवग्याचा पाला हाडांसाठी नैसर्गिक कॅल्शियम बूस्टर मानला जातो. हाडे मजबूत करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. १०० ग्रॅम शेवग्याच्या ताज्या पाल्यामध्ये अंदाजे ४००-४५० मिलीग्रॅम कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांची घनता वाढवते आणि फ्रॅक्चर किंवा कमकुवतपणा टाळते.
शेवग्याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरसदेखील असते. ते हाडे मजबूत करते. मोरिंगामध्ये असलेले मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम हाडांमध्ये खनिजांचे संतुलन राखतात. त्यामुळे हाडे लवचिक आणि मजबूत राहतात. मोरिंगामध्ये शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढवण्यास मदत होते. त्यात असलेले फायटोन्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन डीसारखे काम करतात. त्यामुळे हाडांना कॅल्शियम योग्यरित्या मिळते. हाड आणि सांधेदुखीचे दाह हे एक प्रमुख कारण आहे. शेवग्याच्या पानांमध्ये क्वेरसेटिन आणि क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दाह कमी करतात आणि संधिवातासारख्या समस्यांमध्ये आराम देतात.
या पानांमधील व्हिटॅमिन के हाडांच्या चयापचयाला चालना देते. व्हिटॅमिन बी १२ आणि फोलेट हाडांच्या ऊती दुरूस्त करण्यास मदत करतात. शेवग्याच्या पानांमध्ये हे तिन्ही घटक असतात, ते एकत्रितपणे हाडे मजबूत करण्यास योगदान देतात.
शेवग्याच्या पानांचे सेवन कसे करावे?
सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचा रस घ्या.
शेवग्याच्या पानांची भाजी किंवा सूप करा
मोरिंगा पावडर डाळ किंवा भाजीत वापरू शकता.
मोरिंगा चहादेखील घेऊ शकता.
