Amazing Health BeneCfits Of Eating Mushrooms Diabetes Cancer Cholesterol Diseases Can Be Cured | Loksatta

मशरूम खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होऊ शकते; सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या

Benefits of Mushrooms: मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, बी, पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम आणि लोह असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

mushroom health benefits
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Benefits of Mushrooms: भारतातील अनेक भागात विविध प्रकारचे मशरूम आढळतात. आजकाल मशरूम बाजारात सहज उपलब्ध आहेत. ही एक भाजी आहे जी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते. मशरूमची चवही खूप छान असते. भारतीय बाजारपेठेत मशरूमच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. मशरूम शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही आवडतात. मशरूम केवळ चवीनुसारच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

पण तुम्हाला माहित आहे का की यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. बाजारात अनेक प्रकारचे मशरूम उपलब्ध आहेत. त्यापैकी सुमारे १२ ते १५ हानिकारक आहेत. यामध्ये चमकदार रंगाचे मशरूम सर्वात विषारी मानले जातात. म्हणून, पुढच्या वेळी मशरूम निवडण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि फायदेशीर मशरूम निवडण्यात काळजी घ्यावी लागेल.

मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो ऍसिड असतात. यामुळेच आरोग्याच्या दृष्टीने मशरूमला रामबाण औषध मानले जाते. मशरूम स्वादिष्ट असल्याने अनेकांना खायला आवडते. पण, त्याच्या फायद्यांबद्दल अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला मशरूम खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत.

मशरूम कॅन्सरमध्ये फायदेशीर आहे

आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुजा गौर यांच्या मते, मशरूममध्ये भरपूर पोषक असतात. मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. कारण याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. मशरूम हाडे मजबूत करते आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. कर्करोगातही याचा उपयोग फायदेशीर ठरतो.

( हे ही वाचा: भारतात ‘या’ ठिकाणी कांदा- बटाट्याच्या भावात मिळतात ‘काजू’; शहराचे नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

मशरूम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, मशरूम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मशरूमला नैसर्गिक अँटीबायोटिक मानले जाते. मायक्रोबियल आणि इतर फंगल इन्फेक्शन देखील त्याच्या वापराने बरे होतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात. मशरूम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. मशरूममध्ये उच्च पोषक आणि विविध प्रकारचे एंजाइम असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका खूप कमी होतो.

मशरूम मधुमेहामध्ये फायदेशीर

मधुमेहींसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहेत. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय, हेल्थ लाइननुसार, मशरूम त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये एंटी-एजिंग गुणधर्म असतात. याच्या वापरामुळे त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. त्वचेवर सुरकुत्या दिसत नाहीत.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:51 IST
Next Story
खराब कोलेस्ट्रॉल सकाळी शौचावाटे बाहेर फेकतो ‘हा’ एक पदार्थ; किती प्रमाणात व कसे करावे सेवन जाणून घ्या